शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राहिल्या त्या आठवणी! दिवंगत मित्राच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यावर मंत्री नितीन राऊत भारावतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 19:26 IST

प्राध्यापक डॉ लक्ष्मण बलखंडे हे नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये वनस्पती शास्त्र (बॉटनी) विषयाचे प्राध्यापक होते.

ठळक मुद्दे१९७६ साली नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये रुजू झालेले प्राध्यापक बलखंडे हे २००८ साली निवृत्त झाले. नागपूरहून औरंगाबाद येथे स्थलांतर होऊनही नागपूरमधील मित्र परिवारासोबत स्नेहबंध त्यांनी कायम ठेवले होते. गृहराज्यमंत्री झाल्यावर डॉ राऊत यांनी औरंगाबाद येथे जाऊन बलखंडे सरांची भेट घेतली होती.

मुंबई - माणूस कितीही मोठा झाला तरी आपला जुने मित्र परिवार भेटला की तो त्यांच्या जुन्या आठवणीत रममाण होतो. ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्याबाबत असाच काहीसा प्रत्यय आला. बुधवारी औरंगाबाद येथून डॉ राऊत यांचे जुने मित्र व स्नेही प्राध्यापक डॉ लक्ष्मण बलखंडे यांचे कुटुंब पर्णकुटी बंगल्यावर भेटायला आले असता नितीन राऊत हे आपल्या जुन्या मित्राच्या कुटुंबीयांना भेटून भारावून गेले.

प्राध्यापक डॉ लक्ष्मण बलखंडे हे नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये वनस्पती शास्त्र (बॉटनी) विषयाचे प्राध्यापक होते. त्यावेळी डॉ. राऊत हे शिक्षण घेत होते, तेव्हापासून दोघांमध्ये जिव्हाळ्याचे मैत्रीपूर्ण व कौटुंबिक संबंध होते. १९७६ साली नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये रुजू झालेले प्राध्यापक बलखंडे हे २००८ साली निवृत्त झाले. त्यानंतर नागपूरहून औरंगाबाद येथे स्थलांतर होऊनही नागपूरमधील मित्र परिवारासोबत स्नेहबंध त्यांनी कायम ठेवले होते. तशीच मैत्री डॉ राऊत यांनी बलखंडे सरांसोबत जपली. गृहराज्यमंत्री झाल्यावर डॉ राऊत यांनी औरंगाबाद येथे जाऊन बलखंडे सरांची भेट घेतली होती. २०१४ साली बलखंडे सरांच्या निधनानंतरही राऊत आणि बलखंडे कुटुंबाचा जिव्हाळा आजही कायम आहे.

बलखंडे यांच्या ७२ वर्षीय पत्नी सुहासिनी यांनी आज डॉ. नितीन राऊत यांच्या मलबार हिलमधील शासकीय निवासस्थानी  आल्या होत्या. त्यांनी डॉ. नितीन राऊत आणि त्यांच्या पत्नी सुमेधा राऊत यांची भेट घेतली. यावेळी नागपूरमधील जुन्या कौटुंबिक आठवणीत राऊत कुटुंबीय रमले आणि त्यांना गहिवरून आले. राऊत यांनी आदराने आणि आपुलकीने विचारपूस केल्यानंतर  सुहासिनी बलखंडे यांनाही अश्रू अनावर झाले!

"राऊत आणि बलखंडे कुटुंबात जवळपास ४ दशकांचे घट्ट  नाते आहे. अनेक सुखदुःखाच्या प्रसंगी आम्ही एकमेकांना सोबत केली आहे. आज राऊत आणि त्यांच्या पत्नीशी चर्चा करताना अनेक भावूक आठवणींची उजळणी झाली. माझ्या पतीच्या निधनानंतरही हा जिव्हाळा आणि आपुलकी कायम असल्याचे अनुभवून माझे डोळे भरून आले," असे सुहासिनी बलखंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत