What is the purpose of keeping remedisivir distribution to yourself? Raj Thackeray to Narendra modi | रेमडेसिविर वितरण स्वतःकडे ठेवण्याचे प्रयोजन काय? राज ठाकरेंचा पंतप्रधानांना सवाल

रेमडेसिविर वितरण स्वतःकडे ठेवण्याचे प्रयोजन काय? राज ठाकरेंचा पंतप्रधानांना सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारची भूमिका ही साहाय्यकाची आणि मार्गदर्शनाची आहे. तर, राज्य सरकारांची यंत्रणा प्रत्यक्ष लढ्यात अग्रभागी आहेत. अशा वेळी रेमडेसिविरसारख्या औषधांची खरेदी आणि वितरण केंद्राने स्वतःकडे ठेवण्याचे प्रयोजन काय, असा थेट प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर पत्राद्वारे उपस्थित केला आहे.


राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून रेमडेसिविर आणि इतर औषधे, तसेच कोरोनासाठी अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्यांकडे देण्याची मागणी केली आहे. भारताच्या इतिहासात गेल्या शंभर वर्षांत इतके मोठे आरोग्य संकट आले नसावे. हे आव्हान म्हणूनच फार मोठे आहे, असे सांगतानाच रेमडेसिविरसारख्या कोरोनावरील उपचारासाठी अत्यंत आवश्यक अशा इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वत: करणार असल्याचे वृत्त वाचून धक्का बसल्याचे राज म्हणाले.
अशा प्रकारे वितरण स्वतःकडे ठेवल्याने प्रत्यक्ष काम करणाऱ्या यंत्रणांवरचा अविश्वास तर दिसतोच; शिवाय त्यांच्याकडे असलेल्या स्थानिक परिस्थितीच्या आकलनाला आपण कमी लेखत असल्याचे 
दिसून येत आहे. त्यामुळे रेमडेसिविर कसे घ्यायचे, कुठे, कसे वितरित करायचे याची संपूर्ण जबाबदारी 
आपण राज्यांकडे सोपवावी. ते 
काम खरे तर केंद्राचे नाही, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.

Web Title: What is the purpose of keeping remedisivir distribution to yourself? Raj Thackeray to Narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.