west bengal elections no popular leaders like mamata banerjee winning by large margins prashant kishore | West Bengal Election : ममता बॅनर्जींसारखा कोणताही लोकप्रिय नेता नाही, मोठ्या फरकानं निवडणूक जिंकतील : प्रशांत किशोर

West Bengal Election : ममता बॅनर्जींसारखा कोणताही लोकप्रिय नेता नाही, मोठ्या फरकानं निवडणूक जिंकतील : प्रशांत किशोर

ठळक मुद्दे राज्यात ममता बॅनर्जींविरोधात कोणताही असंतोष नाही, प्रशांत किशोर यांचं वक्तव्यकिमान २५ टक्के मतं मिळवणं हा फॉर्म्युला असल्याचं प्रशांत किशोर यांचं वक्तव्य

पश्चिम बंगाल निवडणुकीची ममता बॅनर्जी यांच्यासाठी रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांनी मोठा दावा केला आहे. ममता बॅनर्जी या मोठ्या फरकानं विजय मिळवतील असा दावा त्यांनी केला आहे. "पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी थोडी अडचण आहे. परंतु ती तृणमूलच्या काही स्थानिक नेत्यांच्या विरोधात आहे. पक्षानं गेल्या वर्षाभरात ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ममता बॅनर्जींविरोधात पश्चिम बंगालमध्ये असंतोष नाही आणि त्या एक लोकप्रिय नेत्या आहेत," असा दावा त्यांनी केला.
"पश्चिम बंगालमध्ये कमीतकमी ४५ टक्के मतं मिळवण्याचा आमचा फॉर्म्युला आहे. ज्यांना बंगालची समज आहे ते सांगतील की तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या बाजूनं किती महिला मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. मी ८ ते १० वर्षाच्या अनुभवात कोणत्याही महिलेला इतकं लोकप्रिय झालेलं पाहिलं नाही. जितक्या ममता बॅनर्जी आहेत," असं प्रशांत किशोर म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. ममता बॅनर्जी विजय होत आहेत आणि त्या मोठ्या फरकानं विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
"भाजप ताकदवान पक्ष आहे याला मी नाकारत नाही. मी कोणालाही कमी मानत नाही. भाजपसारख्या पक्षाला आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीची गरज नाही. दलित समाजातील लोकांचा मोठा वर्ग भाजपला पाठिंबा देत आहे आणि हिंदी भाषकांवर भाजपची मोठी पकड आहे, हा मोठा फॅक्टर आहे," असंही ते म्हणाले. 

४५ टक्के मतं मिळवणं हा फॉर्म्युला
"आम्हाला कमीतकमी ४५ टक्के मतं मिळवायचीयेत हा आमचा फॉर्म्युला आहे. महिला मतदार एक प्रकारे तृणमूल काँग्रेससाठी एक अॅडवांटेज आहेत. महिला मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडत आहेत. क्लब हाऊसवर सर्वांच्या समोर चर्चा झाली. मी त्यात ऑफिशियल हेच सांगितलं की आम्ही तीच गोष्ट सांगतो जे आम्ही पब्लिकली सांगू," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

Web Title: west bengal elections no popular leaders like mamata banerjee winning by large margins prashant kishore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.