West Bengal Assembly Election 2021: तुमचं शेत नांगरून देतो, पण मत द्या!; प्रचारासाठी उमेदवाराचा भन्नाट फंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 06:58 IST2021-04-04T05:57:37+5:302021-04-04T06:58:12+5:30
West Bengal Assembly Election 2021: खासदार असलेल्या जगन्नाथ सरकार यांनी नादियातील शांतीपूर्व मतदारसंघात ट्रॅक्टरने शेत नांगरून आपला प्रचार केला.

West Bengal Assembly Election 2021: तुमचं शेत नांगरून देतो, पण मत द्या!; प्रचारासाठी उमेदवाराचा भन्नाट फंडा
कोलकाता : निवडणुकीसाठी वाट्टेल ते आणि वाट्टेल तसा प्रचार करून लक्ष वेधणारेही उमेदवार असतात. भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या जगन्नाथ सरकार यांनीही आमदारकीसाठी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. त्यांनी लक्ष वेधलेय ते एका शेतात जाऊन ट्रॅक्टरने केलेल्या नांगरणीमुळे. प्रचारादरम्यान ते एका शेतात पोहोचले आणि चक्क एका शेतकऱ्याचे संपूर्ण शेतच नांगरून दिले आणि मत मलाच दे, असे साकडे घातले. शेत नांगरेपर्यंत शेतकरी त्यांच्या बाजूला बसून होता.
खासदार असलेल्या जगन्नाथ सरकार यांनी नादियातील शांतीपूर्व मतदारसंघात ट्रॅक्टरने शेत नांगरून आपला प्रचार केला. जगन्नाथ सरकार हे रानाघाट लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. आता २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी देऊन शांतीपूर मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे.