शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

West Bengal Election Result 2021 : "भाजपाला पराभूत करता येऊ शकते, भाजपाला आता....’’, बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 6:34 PM

West Bengal Election Result 2021: दणदणीत विजयासह सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी-शाहांच्या समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देभाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांनी ते दाखवून दिले भाजपाला आता पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहेदारुण पराभवानंतर राज्यात जातीय दंगली भडकवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकून विजय मिळवणार असल्याचा दावा करणाऱ्या भाजपाचाममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने दारुण पराभव केला आहे. दणदणीत विजयासह सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी-शाहांच्या समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांनी ते दाखवून दिले आहे. लोकशाहीमध्ये अखेरीच लोकांचे मत महत्त्वाचे असते, असे ममता बॅनर्जींनी सांगितले. तसेच भाजपाला आता पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहे, असा टोला लगावला. ("BJP can be defeated, They now needs political oxygen", Mamata Banerjee Criticize BJP  after victory in West Bengal)

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमधून ममता बॅनर्जी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, भाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांना ते आवडते. लोकांनीच त्यासाठी रस्ता दाखवला आहे. लोकशाहीमध्ये अहंकार दाखवता कामा नये. भाजपा एक जातियवादी पक्ष आहे. ते संकटं निर्माण करतात. फेक व्हिडीओंचा उपयोग करतात. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करतात. भाजपा या देशाच्या घटनात्मक चौकटीला उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे.  भाजपा सरकार युनिव्हर्सल व्हॅक्सिनेशनसाठी परवानगी देत नाही आहे. ते ऑक्सिजन देत नाही आहेत. त्यांना पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहे. भाजपासोबत लढण्यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन ममता बॅनर्जींनी केले. यावेळी ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांनाही टोला लगावला, सीबीआय, ईडी यासारख्या यंत्रणांचा उपयोग करणारे राजकारण होता कामा नये. हा नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या राजकारणाचा अंत असेल. भाजपाचे जुन्या नेत्यांनीही मोदी-शाहा स्टाइल राजकारणावर टीका केलेली आहे. देश आता अशा प्रकारच्या राजकारणाचा सामना करू शकणार नाही. मोदी-शाहांच्या तुलनेक अनेक चांगले उमेदवार देशात आहेत, असेही त्या म्हणाल्या.निकालांनंतर बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचे खापरही त्यांनी भाजपाच्या माथ्यावर फोडले. हा भाजपाचा प्रोपेगेंडा आहे. काही किरकोळ घटना घडल्या आहेत. त्या प्रत्येक राज्यात घडतात. त्या योग्य आहेत असे मी म्हणणार नाही. पण दारुण पराभवानंतर राज्यात जातीय दंगली भडकवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच भाजपाविरोधात लढण्यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा