शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

West Bengal election: "भाजप युपीतून टिळा लावलेले गुंड बोलवतायत, मोदींसारखी खोटी व्यक्ती पाहिली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 18:24 IST

विष्णूपूरमध्ये ममता बॅनर्जींचा हल्लाबोल, उत्तर प्रदेशातून पान मसाला खाणारे गुंड बोलावले जात आहे, ममता बॅनर्जींची टीका

ठळक मुद्देविष्णूपूरमध्ये ममता बॅनर्जींचा हल्लाबोलउत्तर प्रदेशातून पान मसाला खाणारे गुंड बोलावले जात आहे, ममता बॅनर्जींची टीका

पुढील काही दिवसांत पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आपला गड राखण्याचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपही आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या दोन्ही बाजूनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच पश्चिम बंगालमध्ये आलेल्या पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तसंच ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हटलं होतं. आता ममता बॅनर्जी यांनी पलटवार करत भाजप उत्तर प्रदेशातून गुंड मागवत असल्याचं म्हणत जोरदार निशाणा साधला. ममता बॅनर्जी यांनी विष्णूपूर येथील रॅलीत जनतेला संबोधित केलं. "पान मसाला खाणारे आणि टिळा लावणाऱ्या लोकांना उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून निवडणुकीपूर्वी समस्या निर्माण करण्यासाठी पाठवलं गेलं. ते आमच्यासाठी बाहेरील गुंड आहेत. आम्ही अनेक वर्षांपासून बंगालमध्ये राहत आहोत आम्ही अन्य राज्यातील लोकांवर बाहेरचे असण्याचा ठपका लावत नाही," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

मोदींचा सन्मान करत होते, पण....ममता बॅनर्जी यांनी बुधवारी रॅलीदरम्यान बोलताना पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना खोटी व्यक्ती म्हटलं. तसंच भाजप बाहेरील राज्यातून गुंड आणत असल्याचा आरोपही केला. "यापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करत होते. परंतु ते असे असतील हे माहित नव्हतं.  मी पंतप्रधान मोदींसारखी खोटी व्यक्ती पाहिली नाही. नरेंद्र मोदी खोटं बोलतात हे म्हणतानाही आपल्याला खेद वाटत आहे. कोण गुंड आहेत? आज उत्तर प्रदेशात भाजपच्या त्रासामुळे आयपीएस अधिकारी आपली नोकरी सोडत आहेत," असंही त्या म्हणाल्या.मोदी, शाह, अदानी लुटणारभाजप पश्चिम बंगालची संस्कृती नष्ट करण्यासाठी उत्तर प्रदेशातून गुंज आणत आहे, असा आरोपही बॅनर्जी यांनी यावेळी केला. शेतकरी मोठ्या कालावधीपासून सस्त्यावर आहे. हे मोदी, अमित शाह आणि अदानी या तीन सिंडीकेट्समुळे आहे. अदानी सर्व पैसा आणि उत्पादन लुटतील. केवळ अदानी, मोदी आणि शाहंनाचं खाणं मिळेल आणि बाकी जनता रडत राहिल, असंही त्या म्हणाल्या. "पंतप्रधान मोदींनी सर्वांना १५ लाख रूपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांनी कोणाला काही दिलं? तर आता १५ लाख रूपये नाही तर भाजपला मतही नाही. भाजपनं सांगितलं मुलींना शिकवा, मुलींना वाचवा, परंतु ते एकही रूपया खर्च करत नाही. आमचं सरकार सर्व मुलींना १००० ते २५०० रूपये शिष्यवृत्ती देत आहे," असंही ममता बॅनर्जींनी यावेळी नमूद केलं. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीChief Ministerमुख्यमंत्रीNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानUttar Pradeshउत्तर प्रदेश