शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election 2021: "ममता दीदी नंदीग्राममध्ये पराभूत होतायत", अमित शहांनी जाहीर सभेत थेट भविष्यवाणीच केली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 15:28 IST

West Bengal Election 2021, Amit Shah: "ममता दीदी पश्चिम बंगालमध्ये हुकुमशाही आणि एकाधिकारशाहीनं सरकार चालवत आहेत", अमित शहा बरसले.

West Bengal Election 2021, Amit Shah: "ममता दीदी पश्चिम बंगालमध्ये हुकुमशाही आणि एकाधिकारशाहीनं सरकार चालवत आहेत. पण केंद्रातील मोदी सरकार विकास, विश्वास आणि व्यापाराच्या मुद्द्यावर सरकार चालवत आहे", असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज पश्चिम बंगालच्या कूच बिहार येथील जाहीर सभेत म्हणाले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कूच बिहार जिल्ह्यातील सीतलकूची येथील रॅलीमध्ये अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला केला. (Amit Shah Claims Mamata Banerjee Going Lost In Nandigram) 

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या जनतेसोबत नेहमीच अन्याय केला आहे. भाजप पश्चिम बंगालच्या विकासाठी दरवर्षी २ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ममता दीदी नंदीग्राममध्ये पराभूत होणार आहेत असाही दावा शहा यांनी यावेळी केला. 

"दीदींच्या मनात जनतेची चिंता नाहीय. तर त्यांच्या मनात त्यांच्या भाच्याची चिंता आहे. त्या त्यांच्या भाच्याला मुख्यमंत्री करू पाहताहेत. भाच्याच्या कल्याणावर त्यांचा विश्वास आहे आणि मोदीजी प.बंगालमधील जनतेच्या कल्याणासाठी झटणारे नेते आहेत", असं अमित शहा म्हणाले. 

ममता बॅनर्जी यांनी प.बंगालला मागासलेलं ठेवलं असाही आरोप त्यांनी यावेळी केला. "दीदींनी ना रस्त्यांवर लक्ष दिलं, ना कनेक्टिव्हिटीवर, ना आरोग्यावर. आज पश्चिम बंगालमध्ये तंबाखूचं उत्पादन चांगलं होतंय. पण त्याचा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी ममता दीदींनी काहीच केलं नाही", अशी टीका शहा यांनी केली आहे. 

नंदीग्राममध्ये ममता दीदी होणार पराभूत?अमित शहा यांनी यावेळी नंदीग्राम मतदार संघाबाबत भविष्यवाणीच करुन टाकली. "दीदींनी प.बंगालमधील जनतेसोबत नेहमीच अन्याय केला आहे. म्हणूनच त्या आता तुम्हाला घाबरत आहेत. काल नंदीग्रामनं दाखवून दिलं आहे की त्या आता पराभूत होणार आहेत. त्यांच्या सल्लागारानं दीदींना विचारलंय की आता तुम्ही कुठून लढणार? त्यावर दीदी म्हणाल्या की, बंगालचा उत्तर भाग वगळून मला इतर कुठूनही लढू द्या. हे उत्तर बंगालचे लोक मला जिंकवणार नाहीत", असा खळबळजनक खुलासा अमित शहा यांनी भर सभेत केला आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस