शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 11, 2021 2:36 PM

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? (West Bengal cooch behar home minister Amit Shah)

ठळक मुद्देममता बॅनर्जींना गुंडं लोक निवडणूक जिंकूण देतात. त्यांच्या 'दंगा प्रमुखां'सोबत भाजपचे 'ब्लॉक प्रमुख' लढतील आणि जिंकतीलही - शाहबंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? - शाहबंगालच्या जनतेने परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे, असेही शाह म्हणाले.

कोलकाता - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) आज पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या (West Bengal) रणांगणात उतरले. "यावेळी बंगालमधील निवडणूक ऐतिहासिक होईल. ममता बॅनर्जींना गुंडं लोक निवडणूक जिंकूण देतात. त्यांच्या 'दंगा प्रमुखां'सोबत भाजपचे 'ब्लॉक प्रमुख' लढतील आणि जिंकतीलही," अशा शब्दात शाह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ते कूचबिहारमध्ये (cooch behar) रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. (West Bengal cooch behar home minister Amit Shah in Poriborton yatra)

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपता-संपता ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाची मते घेण्यासाठीच असे करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल. 

समाजात दुही पाडण्यासाठी रथयात्रेचा भाजपकडून वापर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

यावेळी, भाजपचे सरकार आल्यास एका आठवड्याच्या आत बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अमित शाह यांनी केली. ममता आणि त्यांचा भाचा मे महिन्यानंतर बंगालमध्ये केंद्राच्या योजना लागू करण्यापासून रोखू शकणार नाहीत. एवढेच नाही, तर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाईल, असेही शाह म्हणाले.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, येथील विकासासाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने काही केले नाही. भाजप सरकार, मोदींचे सूत्र 'सबका साथ-सबका विकास', या मार्गाने चालत आहे. आम्ही सर्व समाजांची संस्कृती, भाषा, संगीत आणि साहित्य पुढे घेऊन जाणारे लोक आहोत. यामुळेच हळू-हळू संपूर्ण देश मोदींच्या नेतृत्वात भाजपशी जोडला जात आहे. यावेळी, ममता दीदी, ही लढाई आपण जिंकू शकणार नाही. कारण बंगालच्या जनतेने परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे, असेही शाह म्हणाले.

व्हायरल झालं ममता बॅनर्जींचं 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा'; पाहा का म्हणाल्या त्या असं 

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगाल