शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

West Bengal Assembly Elections 2021 : 'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका, हजारो समर्थकांसह तृणमूल नेत्याचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 11:06 IST

West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And Mohan Sharma : बंगालच्या अलीपूरदार जिल्ह्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचदरम्यान हजारो समर्थकांसह तृणमूलच्या एका नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. याच दरम्यान गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. अशातच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांतील मतदान पार पडलं आहे. मात्र अजुनही पक्ष बदलणं सुरूच आहे. शुक्रवारी बंगालच्या अलीपूरदार जिल्ह्यात गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान हजारो समर्थकांसह तृणमूलच्या (TMC) एका नेत्याने भाजपात (BJP) प्रवेश केला आहे.

तृणमूल काँग्रेसचे नेते मोहन शर्मा (Mohan Sharma) आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत भाजपामध्ये दाखल झाले आहेत. मोहन शर्मा हे तृणमूल काँग्रेसचे जुने नेते आहेत. त्यांनी पक्षासाठी अलीपूरदार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. तसेच ते अलीपूरदार जिल्हा परिषदेचे सल्लागारही होते. अमित शहांच्या उपस्थितीत मोहन शर्मा यांच्यासहीत तृणमूलच्या हजारो कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपच्या सेंट्रल कमिटीचे महासचिव अरविंद मेनन यांनी मोहन शर्मा यांच्या हाती पक्षाचा झेंडा सोपवला.

मोहन शर्मा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे तृणमूलचं खूप मोठं राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण मोहन शर्मा यांची अलीपूरदार जिल्ह्यात चांगलीच पकड असल्याचं म्हटलं जातं. पश्चिम बंगालच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. 27 मार्च आणि 1 एप्रिल रोजी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं. तिसऱ्या टप्प्यातील 31 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावर्षी भाजपा आणि तृणमूलमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल"

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut ) यांनी देशातील चार राज्यांच्या निवडणुका या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा ठरवणार आहेत. खासकरून पश्चिम बंगाल आणि आसाम असं म्हटलं आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Elections 2021) भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. यासोबतच लॉकडाऊन किंवा कोरोनाचं राजकारण करु नये असं देखील त्यांनी म्हटलं आहे.  Shivsena Sanjay Raut And Mamata Banerjee Over West Bengal Assembly Elections 2021

"पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा स्पष्ट करणार आहेत. खासकरुन पश्चिम बंगाल आणि आसाम….केरळ आणि तामिळनाडूत काय होईल याचा अंदाज आपण मांडू शकतो. पण आसाममध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाजपाचं राज्य असलं तरी काँग्रेस तगडी फाईट देत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे या निकालांनंतरच देशाचं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे आणि विरोधी पक्षांच्या आघाड्या स्थापन होऊन ते कोणती भूमिका घेत आहेत हे स्पष्ट होईल" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाAmit Shahअमित शहाPoliticsराजकारण