शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

ममता बॅनर्जी सुवेंदू अधिकारी आणि भाजपाला थेट भिडणार, नंदिग्राममधून निवडणूक लढवणार

By बाळकृष्ण परब | Published: March 05, 2021 3:00 PM

west bengal assembly election 2021, Mamata Banerjee Will contesting from Nandigram : गेल्या १० वर्षांपासून बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला यावेळी भाजपाने कडवे आव्हान दिले आहे.

कोलकाता - संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे (West Bengal assembly election 2021) बिगूल वाजले आहे. गेल्या १० वर्षांपासून बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला यावेळी भाजपाने कडवे आव्हान दिले आहे. सुवेंदू अधिकारींसारखे तृणमूल काँग्रेसच्या गोटातील अनेक बडे नेते भाजपात डेरेदाखल झाल्याने ममता बॅनर्जींसमोरील आव्हान कठीण बनले आहे. (Mamata Banerjee  Will contesting from Nandigram) त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करताना एक मोठी घोषणा केली आहे. (Mamata Banerjee will face Suvendu Adhikari and BJP directly, contesting from Nandigram)

तृणमूल काँग्रेसविरोधात बंडखोरी करत भाजपात दाखल झालेल्या आणि या निवडणुकीत नंदिग्राम आणि आसपासच्या भागात तृणमूलसाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना थेट आव्हान देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मतदारसंघ सुवेंदू अधिकारी यांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने आता येथे ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. 

याबाबतचा निर्णय जाहीर करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आज आम्ही २९१ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करत आहोत. यामध्ये ५० महिला आणि ४२ मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. तर उत्तर बंगालमधील ३ जागांवर आम्ही उमेदवार देणार नाही. तसेच मी स्वत: नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.  

मी ९ मार्च रोजी नंदिग्रामला जाणार आहे. तर १० मार्च रोजी मी हल्दिया येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिली.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा