पिंजऱ्यातील ‘वाघा’शी आम्ही दोस्ती करत नाही, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 07:24 IST2021-06-11T07:23:55+5:302021-06-11T07:24:23+5:30

Chandrakant Patil : पाटील यांनी नुकतेच, ‘नरेंद्र मोदींनी सांगितले तर आम्ही वाघाशी दोस्ती करू’ असे वक्तव्य केले होते. त्यावर संजय राऊत यांनी, ‘वाघाशी मैत्री होत नाही तर वाघ ठरवतो कुणाशी दोस्ती करायची,’ असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देत पाटील यांनी डिवचले. 

We are not friends with 'Wagha' in the cage, Chandrakant Patil's Sanjay Raut | पिंजऱ्यातील ‘वाघा’शी आम्ही दोस्ती करत नाही, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

पिंजऱ्यातील ‘वाघा’शी आम्ही दोस्ती करत नाही, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

पुणे : “आम्ही वाघाशी दोस्ती करायला तयार आहोत, पण ती जंगलातील वाघाशी. वाघ जोपर्यंत जंगलात होता तोपर्यंत आमची दोस्ती होती, आता वाघ पिंजऱ्यात अडकला आहे आणि आम्ही पिंजऱ्यातील वाघाशी दोस्ती करत नाही,” अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.

पाटील यांनी नुकतेच, ‘नरेंद्र मोदींनी सांगितले तर आम्ही वाघाशी दोस्ती करू’ असे वक्तव्य केले होते. त्यावर संजय राऊत यांनी, ‘वाघाशी मैत्री होत नाही तर वाघ ठरवतो कुणाशी दोस्ती करायची,’ असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देत पाटील यांनी डिवचले. 
 

Web Title: We are not friends with 'Wagha' in the cage, Chandrakant Patil's Sanjay Raut