शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अहमद पटेल, गांधी कुटुंबावर टीकेचे बाण; अगुस्तावरुन मोदींचं शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 17:53 IST

अगुस्ता वेस्टलँड घोटाळ्यावरुन मोदींची घणाघाती टीका

देहरादून: अगस्ता वेस्टलँड घोटाळ्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा थेट गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. अगस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीत 'AP' आणि 'FAM' यांना लाच देण्यात आली, अशी घणाघाती टीका मोदींनी केली. यावेळी त्यांनी अगस्ता प्रकरणातील मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेलचा संदर्भ देत काँग्रेसवर शरसंधान साधलं. ते उत्तराखंडमध्ये जनसभेला संबोधित करत होते. चौकीदारानं हेलिकॉप्टर घोटाळ्यातील काही दलालांना दुबईहून भारतात आणलं. यानंतर इटलीच्या मिशेल मामा आणि इतर मध्यस्थांची चौकशी झाली, असं मोदी म्हणाले. 'या प्रकरणाच्या आरोपपत्रात एपी आणि फॅम असा असा उल्लेख आहे. यातील एपीचा अर्थ अहमद पटेल आणि फॅमचा अर्थ फॅमिली असा होतो. आता अहमद पटेल कोणत्या फॅमिलीचे निकटवर्तीय आहेत, हे तुम्हीच मला सांगा,' असं म्हणत मोदींनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. 'ज्या कुटुंबाची विमानतळावर कोणीही चौकशी करत नव्हतं, ज्यांना सर्वजण सलाम करायचे, ते आज जामीनावर आहेत. जे स्वत:ला देशाचे भाग्यविधाते समजत होते, ते आज तुरुंगवारी टाळण्याचे प्रयत्न करत आहेत,' अशा शब्दांमध्ये मोदींनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही तोंडसुख घेतलं. 'काँग्रेसचा जाहीरनामा पाहिल्यास त्यांचा हात कोणासोबत आहे ते समजेल. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी, फुटिरतावादी कारवाया करणाऱ्यांविरोधात कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा दलांना विशेषाधिकार देण्यात आले आहेत. काँग्रेस या विशेषाधिकारांच्या विरोधात आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास सुरक्षा दलांना देण्यात आलेला विशेषाधिकार काढून घेण्यात येईल. त्यामुळे त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल,' असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस