शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Video: बाबो! चक्क मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो स्थानकावर 'भाऊगर्दी'; कोरोनावरून मनसेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 17:51 IST

CM Uddhav Thackeray Warn on Corona Crisis to people: मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या चाचणीला हिरवा कंदील दाखविला त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत मेट्रो स्थानकावर झालेली भाऊगर्दी दाखविली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ उभारण्यात आल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मेट्रोची चाचणी देखील आज सुरु करण्यात आली. मात्र, या कार्यक्रमाला जेवढी मेट्रोमध्ये जाण्यासाठी नसते तेवढी गर्दी कोरोना काळात जमल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. यावर मनसेच्या नेत्यांनी टीका केली आहे. (Huge Crowd when CM uddhav Thackeray flag off to Akurli metro Station )

Mumbai Metro : मेट्रो ट्रायल रनच्या कार्यक्रमादरम्यान भाजपचं काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन

मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या चाचणीला हिरवा कंदील दाखविला त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत मेट्रो स्थानकावर झालेली भाऊगर्दी दाखविली आहे. ''लोका सांगे ब्रह्मज्ञान... मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना नियमांना हरताळ फासला जातोय, मग त्याचं खापर लोकांवर कशाला फोडताय? मेट्रो चाचणी उद्घाटन कार्यक्रमाला गर्दी केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा... 

मेट्रोच्या आकुर्ली स्थानकाला फुलांचा साज चढविण्यात आला होता. स्थानकाच्या फलाटावर चाचणीसाठीची मेट्रो मोठ्या दिमाखात उभी होती. पश्चिम द्रुतगती मार्गावर चाचणी होणाऱ्या मेट्रोला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्वच्छ आणि सुंदर अशा आकूर्ली मेट्रो स्थानकावर सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी साठीच्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला; आणि चाचणी करिता मेट्रो धावू लागली.  

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यावेळी म्हणाले की, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ सुरु झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्टयातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. चालकविरहीत ट्रेनशी अनुकूलता, ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम, प्रत्येक बाजूला चार दरवाजांची स्टेनलेस स्टील बॉडी आणि प्रवाशांना सायकलसह प्रवास करता येऊ शकेल, असे मेट्रोचे फायदे आहेत.  बीईएमएल, बंगळुरु  हे हिटाची, जपान यांच्या तांत्रिक सहकार्याने मेट्रोचे सेट तयार करत आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही प्रकल्पातून दररोज सुमारे ९ लाख प्रवासी प्रवास करतील. सहा डब्यांच्या ट्रेनकरिता प्रवासी भाडे दराचा विचार करत हे भाडे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे असेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMetroमेट्रोCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस