पंजाबमध्ये काँग्रेसचा जयजयकार तर भाजपाची हार, निकालांनंतर उर्मिला मातोंडकरचे हे ट्वीट होतेय व्हायरल
By बाळकृष्ण परब | Updated: February 17, 2021 16:19 IST2021-02-17T16:11:59+5:302021-02-17T16:19:19+5:30
Shiv Sena leader Urmila Matondkar tweet on farmer Protest goes viral punjab local body elections 2021 results : पंजाबमध्ये आज झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसचा जयजयकार तर भाजपाची हार, निकालांनंतर उर्मिला मातोंडकरचे हे ट्वीट होतेय व्हायरल
मुंबई - पंजाबमध्ये आज झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे. (punjab local body elections 2021 results) यामध्ये सात महानगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपा (BJP) आणि अकाली दल (Akali Dal) या विरोधी पक्षांची दाणादाण उडवली आहे. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांवर शेतकरी आंदोलनाचा (farmer Protest) प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पंजाबमधील निकालानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेता असलेल्या उर्मिला मातोंडकर हिचे एक ट्विट व्हायरल होत आहे. (Urmila Matondkar's tweet goes viral )
पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालावर प्रतिक्रिया देताना उर्मिला मातोंडकर हिने म्हटले आहे की, ‘#PunjabMunicipalElection2021 चा जनादेश स्पष्ट आहे. #FarmersMakelndia', अशा प्रकारे उर्मिला मातोंडकर हिने पंजाबमधील भाजपाच्या पराभवाचा संबंध थेट शेतकरी आंदोलनाशी जोडला आहे. त्यामुळे हे ट्विट आजच्या दिवसात चर्चेचा विषय ठरले आहे.
#PunjabMunicipalElection2021 the Verdict is clear !!#FarmersMakelndia 🙏✊
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) February 17, 2021
केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याने त्यांना महत्त्व आले होते. दरम्यान, पंजाबमधील या निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवला आहे. काँग्रेसने मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट, बटाला आणि भटिंडा येथील महानगरपालिकांमध्ये विजय मिळवला आहे. भटिंडा महानगरपालिकेत तर काँग्रेसने तब्बल ५३ वर्षांनंतर विजय मिळवला आहे, त्यामुळे या विजयाला विशेष महत्त्व आहे.