शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

उद्धव ठाकरे यांची आज ठाण्यात रस्त्यावर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:30 IST

सत्ताधारी शिवसेनेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारची सभा घेण्यासाठी रस्त्याचा आसरा घ्यावा लागला आहे.

ठाणे : निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यात यापूर्वी सहज मैदान, रस्ते उपलब्ध होत होती. परंतु, आता त्यावर कायदेशीर निर्बंध आल्याने मैदान आणि रस्ता सभांसाठी मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे मागील काही दिवस शिवसेना आणि राष्ट्रवादीची सभेसाठी मैदान आणि रस्ता शोधमोहीम सुरू होती. अखेर, सत्ताधारी शिवसेनेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारची सभा घेण्यासाठी रस्त्याचा आसरा घ्यावा लागला आहे.गेली कित्येक वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेला शहरात साधे मैदान विकसित करता आलेले नाही. त्यामुळे आता रस्त्यावरच सभा घेण्याची नामुश्की त्यांच्यावर ओढवली आहे. रस्त्यावर सभा घेऊ नये, असे संकेत असतानाही त्याला परवानगी दिली कशी, याबाबत ठाणेकरांत संताप व्यक्त होत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. रॅली, चौकसभा झाल्यानंतर विविध पक्षांकडून प्रमुख नेत्यांच्या सभा घेण्याची सुरुवात झाली आहे. मागील काही दिवस सभा कुठे घ्यायची, असा मोठा पेच या मंडळींना पडला होता. सेंट्रल मैदानात ती घेता येऊ शकत नाही. गावदेवी मैदान नाही आणि शिल्लक राहिलेल्या शिवाजी मैदानात सभा घेण्यास परवानगी असली, तरी जागा मात्र छोटी, त्यामुळे सभा कुठे घ्यायची, असा पेच या मंडळींना पडला होता. अखेर, शिवसेनेने यात सत्तेच्या बळावर महापालिका मुख्यालयासमोरच सभा घेण्याचे निश्चित केले आहे. मागील काही दिवस त्यांच्याकडून मैदानांची चाचपणी सुरू होती. परंतु, मागील २५ वर्षांहून अधिक काळ सत्तेत असतानाही सत्ताधाऱ्यांना साधे मैदान विकसित करता आलेले नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना