शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

"उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की कोरोना त्यांच्या आसपासही फिरकला नाही’’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 7:04 PM

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष झाल्याप्रित्यर्थ महाविकास आघाडीतर्फे ' महाराष्ट्र थांबला नाही.महाराष्ट्र थांबणार नाही.' या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात एवढा अभ्यास केला ती त्यामुळे ते अर्धे डॉक्टर बनले आहेतत्यामुळेच कोरोना विषाणू त्यांच्या आसपासही फिरकला नाहीउद्धव ठाकरेंच्या माझं कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत झाली

मुंबई - राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात एवढा अभ्यास केला ती त्यामुळे ते अर्धे डॉक्टर बनले आहेत. त्यामुळेच कोरोना विषाणू त्यांच्या आसपासही फिरकला नाही, असे उदगार अजित पवार यांनी काढले आहेत.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष झाल्याप्रित्यर्थ महाविकास आघाडीतर्फे ' महाराष्ट्र थांबला नाही.महाराष्ट्र थांबणार नाही.' या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात एवढा अभ्यास केला ती त्यामुळे ते अर्धे डॉक्टर बनले आहेत. त्यामुळेच कोरोना विषाणू त्यांच्या आसपासही फिरकला नाही, उद्धव ठाकरेंच्या माझं कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत झाली, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला नाव न घेता जोरदार टोले लगावले. शिवसेनेला अनेकांनी गृहित धरले. मात्र शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.शिवसेनेला अनेकांनी गृहित धरले. मात्र शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही.जनतेच्या विश्वासाने हे सरकार चाललं आहे. तीन चाकी सरकार म्हणून या सरकारची हेटाळणी केली जाते. मात्र या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.आम्ही राज्यातील कोरोनाचे आकडे लपवले नाहीत. आम्ही कोरोनावर लवकरच मात करू. नैसर्गिक संकटांना महाराष्ट्र कधी घाबरला नाही आणि आणि घाबरणारही नाही. तसेच जर कुणी राजकीय संकट आणत असेल. तर ते संकट मोडून तोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी