"Uddhav Thackeray studied the corona so much that the corona did not even revolve around him." - Ajit Pawar | "उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की कोरोना त्यांच्या आसपासही फिरकला नाही’’

"उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की कोरोना त्यांच्या आसपासही फिरकला नाही’’

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात एवढा अभ्यास केला ती त्यामुळे ते अर्धे डॉक्टर बनले आहेतत्यामुळेच कोरोना विषाणू त्यांच्या आसपासही फिरकला नाहीउद्धव ठाकरेंच्या माझं कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत झाली

मुंबई - राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात एवढा अभ्यास केला ती त्यामुळे ते अर्धे डॉक्टर बनले आहेत. त्यामुळेच कोरोना विषाणू त्यांच्या आसपासही फिरकला नाही, असे उदगार अजित पवार यांनी काढले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष झाल्याप्रित्यर्थ महाविकास आघाडीतर्फे ' महाराष्ट्र थांबला नाही.महाराष्ट्र थांबणार नाही.' या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात एवढा अभ्यास केला ती त्यामुळे ते अर्धे डॉक्टर बनले आहेत. त्यामुळेच कोरोना विषाणू त्यांच्या आसपासही फिरकला नाही, उद्धव ठाकरेंच्या माझं कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत झाली, असे अजित पवार म्हणाले.दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला नाव न घेता जोरदार टोले लगावले. शिवसेनेला अनेकांनी गृहित धरले. मात्र शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेला अनेकांनी गृहित धरले. मात्र शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही.जनतेच्या विश्वासाने हे सरकार चाललं आहे. तीन चाकी सरकार म्हणून या सरकारची हेटाळणी केली जाते. मात्र या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही राज्यातील कोरोनाचे आकडे लपवले नाहीत. आम्ही कोरोनावर लवकरच मात करू. नैसर्गिक संकटांना महाराष्ट्र कधी घाबरला नाही आणि आणि घाबरणारही नाही. तसेच जर कुणी राजकीय संकट आणत असेल. तर ते संकट मोडून तोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला.

Web Title: "Uddhav Thackeray studied the corona so much that the corona did not even revolve around him." - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.