शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

Anil Deshmukh resign: उद्धव ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही; केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 6:50 PM

Ramdas Athawale Speak on Maharashtra politics after Anil Deshmukh resign: गृह मंत्री अनिल देशमुखांना (Home Minister Anil Deshmukh) आधीच राजीनामा देण्य़ाची गरज होती. मात्र त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांना गृह मंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले आहे. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी (Central Minister Ramdas Athavale) महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर मोठे विधान केले आहे. राज्या कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. इथे राष्ट्रपती राजवट लावली जावी. यासंबंधात मी राष्ट्रपतींना पत्र लिहिल्याचे ते म्हणाले. (Ramdas Athawale speak on MVA government Tenuare complition.)

रामदास आठवले यांनी सांगितले की, आता असे वाटत नाहीय की महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) राज्यात आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नाहीय. देशात कोरोनाचे 60 ते 65 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. अशातच राज्य सरकारची स्थिती डोलायमान दिसू लागली आहे. 

गृह मंत्री अनिल देशमुखांना (Home Minister Anil Deshmukh) आधीच राजीनामा देण्य़ाची गरज होती. मात्र त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. आता पवारांनीच देशमुखांना राजीनामा देण्यास परवानगी दिली ही चांगली बाब आहे, असे आठवले म्हणाले. 

Anil Deshmukh resign: अनिल देशमुख दिल्लीच्या विमानात बसले; सर्वोच्च न्यायालयात की आणखी कोणाच्या भेटीला...

आज काय घडले...शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांची सिल्व्हर ओक बैठक झाली, यात देशमुखांनी गृहमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली त्याला शरद पवारांनीही ग्रीन सिग्नल दिला. या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला आहे.

हायकोर्टात काय घडलं?

याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी वसुलीच्या आरोपाची सीबीआय चौकशी करावी अशी याचिका हायकोर्टात दाखल केली होती, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलीस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकत नाही असं याचिकेत म्हटलं होतं, या याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने सीबीआय संचालकांना या प्रकरणी १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचसोबत जर यात कोणत्याही प्रकारे गुन्हा आढळत असेल तर FIR दाखल करण्यासही म्हटलं आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवलेAnil Deshmukhअनिल देशमुखShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार