शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 6:17 AM

शरद पवार म्हणाले, राजाला साथ द्या

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचे माप पुन्हा एकदा विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याच पारड्यात टाकले. त्यामुळे ‘झाले गेले विसरून जावे...पुढे-पुढे चालावे,’ असा संदेशच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यातील आमदार व प्रमुख नेतेमंडळींना दिला. ‘राजाला साथ द्या,’ अशी साद पवारांनी यावेळी सर्व आमदारांना घातली.राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई येथे पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला सातारा जिल्ह्यातील आमदारांसह स्वत: खासदार उदयनराजे भोसले हेही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंना सोडून कुणालाही उमेदवारी द्या, अशी मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदार मंडळींची होती. राष्ट्रवादीची उमेदवारी मिळत नसेल उदयनराजेंनी भाजपमध्ये जावे, अशी मागणी सातारा विकास आघाडीच्या सदस्यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीच्या सदस्यांनी तर उदयनराजेंना राष्ट्रवादीने तिकीट दिल्यास शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये जावे, अशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.खासदार पवार जी भूमिका घेतील, ती आपल्याला मान्य असेल, असे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी या बैठकीतही स्पष्ट केले. त्यानुसार शरद पवार यांनी उदयनराजेंना पुन्हा झुकते माप दिले आहे. सर्व आमदारांनी लोकसभेला मागील सर्व विसरून प्रचार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. तसेच आमदारांनीही त्यांचा प्रचार करण्याचे मान्य केले.या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर, आमदार अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील आदींची उपस्थिती होती.रिंगमास्टर बारामतीकर पवार : पाटील‘साताऱ्याच्या राजकारणाचे व अर्थकारणाचे सर्व निर्णय हे बारामतीत बसून खासदार शरद पवार हेच घेत असतात. दि गे्रट सातारा सर्कशीत उदयनराजेंसह सर्वच आमदार मंडळींचे बारामतीकर पवार हे रिंगमास्टर आहेत,’ अशी बोचरी टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे सातारा, हातकणंगले, माढा, सांगली, कोल्हापूर व उस्मानाबाद हे सहा लोकसभा मतदारसंघ लढविण्यात येणार आहेत, याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.किरकोळ वाद विवाद हे वाद हे कुठल्या पक्षात नसतात? कार्यकर्त्यांमुळे काही गैरसमज होते. ते आता दूर झाले आहेत. मला शिवेंद्रसिंहराजेंचा कधीच विरोध नव्हता.- उदयनराजे भोसले,खासदारसातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचे मत वेगळे होते. आता त्यांची मला नाराजी दूर करावी लागणार आहे. लोकसभेसह विधानसभेलाही आम्ही एकत्र काम करणार आहोत.- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसले