शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

अडीच वर्षात भाजपाचे २२ जण नाराज झाले, त्यातले ९ जण राष्ट्रवादीच्या गळाला लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 15:28 IST

राज्यात सत्ता, जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार अशा स्थितीत सांगली, मिरज आणि कुपवाडमधील जनतेनेही २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या बाजूने कौल दिला.

ठळक मुद्देभाजपचे दोन्ही आमदार, महापालिका कारभाऱ्यांनी या असंतोषाकडे कानाडोळा केला.भाजपमधील असंतोष त्यांच्या नजरेत आला नसेल तर नवलच. सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीने भाजपला सुरुंग लावण्याचे नियोजन सुरू केले.अर्ज भरेपर्यंत त्यांच्या गटातील नगरसेवकांतही नाराजी, रुसवेफुगवे होत. पण, शेवटी त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता

शीतल पाटील

सांगली : महापालिकेच्या सत्तेत पहिल्यांदाच आलेल्या भाजपच्या अडीच वर्षांच्या कारभारावर आता नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. भाजपाच्या ४३ नगरसेवकांपैकी जवळपास निम्मे म्हणजे २२ नगरसेवक नाराज आहेत. महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर नऊ नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले. महापालिकेच्या बदनामीचे शिंतोंडे अंगावर नको, अशी बोटचेपी भूमिका घेतल्यानेच भाजपवर आजची वेळ आली आहे.(BJP-NCP Politics in Sangli Mayor Election) 

राज्यात सत्ता, जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार अशा स्थितीत सांगली, मिरज आणि कुपवाडमधील जनतेनेही २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या बाजूने कौल दिला. पण, अडीच वर्षांत पारदर्शी कारभाराच्या नावावर कशीबशी सत्ता टिकली. सुरुवातीला थोड्याफार कुरबुऱ्या होत्या. पण, महापौरपद खुले होताच या कुरबुऱ्यांना असंतोषाचे स्वरूप प्राप्त झाले. पण, भाजपचे दोन्ही आमदार, महापालिका कारभाऱ्यांनी या असंतोषाकडे कानाडोळा केला. करिष्म्यावर भरवसा ठेवणाऱ्या भाजपच्या नेत्यांनाही आगामी महापौर, उपमहापौर निवडी निर्विघ्नपणे पार पडतील, असे वाटत होते. पण इथेच त्यांची फसगत झाली.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे करेक्ट कार्यक्रमात माहीर. भाजपमधील असंतोष त्यांच्या नजरेत आला नसेल तर नवलच. सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीने भाजपला सुरुंग लावण्याचे नियोजन सुरू केले. तब्बल २२ नगरसेवक भाजपवर नाराज असल्याचेही दिसून आले. या नगरसेवकांची यादी तयार करून त्यांच्याशी संपर्क वाढविला. त्यांच्या राजकीय भवितव्याची हमीही घेतली. त्यातून सध्याचा महापौर, उपमहापौर निवडीचा खेळ रंगला आहे.

राष्ट्रवादीने १२ नगरसेवकांशी अर्थपूर्ण बोलणी केली. अडीच वर्षांच्या सत्तेत लक्ष्मीदर्शनपासून लांब असलेल्या या नगरसेवकांनीही भाजपला चकवा दिला. त्यातील तीन जणांना शहराबाहेर हलविण्याचा डाव फसला. पण नऊ जण मात्र अज्ञातस्थळी रवाना झाले. आता त्यातील दोघेजण परतले आहे. त्यातील एकाला केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या शब्दाखातीर परतावे लागले. तर, एकाला घरगुती अडचणीमुळे माघारी यावे लागले. पण, ते परत आले असले तरी भविष्यात मनाने भाजपासोबत कितपत राहतील, हा प्रश्न आहेच. भाजपमधील स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांनी महापालिकेच्या कारभारापासून स्वत: नेहमीच दूर ठेवले आहे. याच नेत्यांमुळे जनतेने महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती सोपविल्याचा विसर पडला आहे. स्वत:ची बदनामी नको, भ्रष्ट कारभाराचे शिंतोडे अंगावर नको, या भूमिकेतून भाजपचे नेते महापालिकेचा गाडा  हाकत आहेत.

सत्तेचा सोपान मदनभाऊंनाच लाभदायक

महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत तीनवेळा मदन पाटील यांची सत्ता होती. तर, एकदा विकास महाआघाडी तर आता भाजपची सत्ता आहे. मदनभाऊंच्या सत्ताकाळातही नगरसेवकांत पदासाठी चढाओढ होत असे. अर्ज भरेपर्यंत त्यांच्या गटातील नगरसेवकांतही नाराजी, रुसवेफुगवे होत. पण, शेवटी त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. त्यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांचा कालखंड पूर्ण होत असे. महाआघाडीच्या काळात अडीच वर्षानंतर सत्तेला सुरुंग लावला होता. आताही भाजपची वाटचाल त्याच मार्गावर आहे. त्यातून सत्ता टिकविण्यात भाजपला कितपत यश येते, हे मंगळवारी स्पष्ट होईल.

टॅग्स :SangliसांगलीMayorमहापौरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील