शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

झारखंड सरकार पाडण्याचा कट प्रकरणी महाराष्ट्रातील माजी मंत्र्यासह 'या' ६ भाजपा नेत्यांना नोटीस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 06:16 IST

रांची पोलीस या सहा लोकांचे बयाण नोंदविणार असून, रांची पोलिसांचे पथक मुंबईत तळ ठोकून आहे.

ठळक मुद्देआमदारांना निर्दोष ठरविण्याबाबत कोणत्याही तथ्याकडे डोळेझाक केली जाणार नाही.काॅंग्रेसचे आमदार निर्दोष असल्याचे प्रारंभीच्या तपासात आम्हाला आढळून आले आहे. सखोल तपासानंतर एक आठवड्यात सत्य समोर येईल

एस. पी. सिन्हारांची : झारखंडमधील आमदारांची खरेदी आणि सरकार पाडण्याच्या कटप्रकरणी कारागृहात असलेल्या आरोपींच्या कबुलीजबाबाच्या आधारे महाराष्ट्राचे माजी मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, चरणसिंग ठाकूर यांच्यासह सहा जणांना एक-दाेन दिवसांत नोटीस पाठविण्याची तयारी रांचीच्या पोलिसांनी केली आहे. 

बावणकुळे, ठाकूर यांच्यासह हाॅटेल लीलेकमध्ये वास्तव्याला राहिलेले जयकुमार बेलखेडे, मोहित भारतीय, आशुतोष ठक्कर, अमितकुमार यादव यांना रजिस्टर्ड नोटीस पाठविली जाणार आहे. निर्धारित वेळेत नोटीसला उत्तर न मिळाल्यास या सर्वांना प्रतिवादी बनविले जाईल.  या संपूर्ण प्रकरणात काॅंग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी दारूमाफियांवर बदनामीचा आरोप करून लक्ष वेधले आहे. रांची पोलीस या सहा लोकांचे बयाण नोंदविणार असून, रांची पोलिसांचे पथक मुंबईत तळ ठोकून आहे. चंद्रशेखर बावणकुळे, ठाकूर यांच्यासह एनएसजीचे माजी सहायक कमांडर जयकुमार बेलखेडे, भाजपचे नेते मोहित भारतीय, आशुतोष ठक्कर, अनिल जाधव यांची पोलीस चौकशी करणार आहेत. याप्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत.

सत्य आठवड्यात उघड होणार आमदारांना निर्दोष ठरविण्याबाबत कोणत्याही तथ्याकडे डोळेझाक केली जाणार नाही. आम्ही सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. काॅंग्रेसचे आमदार निर्दोष असल्याचे प्रारंभीच्या तपासात आम्हाला आढळून आले आहे. सखोल तपासानंतर एक आठवड्यात सत्य समोर येईल, असे झारखंडचे वित्त तसेच अन्नपुरवठामंत्री डाॅ. रामेश्वर उरांव यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसJharkhandझारखंड