शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्वाची खरी शिकवण नागपूरला जाऊन घ्यावी, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 12:04 IST

Ashish Shelar : शिवसेना सध्या अमिबालाही लाज वाटेल, अशा भूमिका घेत असल्याची टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

ठळक मुद्देमुंबईतून शरजीलला पळून जाण्यास कुणी मदत केली, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आशिष शेलार म्हणाले. 

मुंबई : हिंदुत्वाची खरी शिकवण मिळते ती नागपूरच्या कार्यालयात, आपण याआधी सतत भेटलो आहोत. आताही त्याठिकाणी जाऊन यावे, असा टोला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

दरम्यान, एकीकडे हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते, तेव्हा तो निर्माणही होतो, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले होते. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाला बाजूला ठेवायच्या कुहेतूचा पर्याय म्हणून दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन जे सत्तेत आले, त्यांना हे बोलणे शोभत नाही, असे आशिष शेलार म्हणाले.

याचबरोबर, एल्गार परिषदेत काही ना काही गडबड होते व धार्मिक भावना दुखावल्या जातात, अशी पार्श्वभूमी असतानाही परवानगी का दिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यापर्यंत आणि मुंबईतून शरजीलला पळून जाण्यास कुणी मदत केली, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आशिष शेलार म्हणाले. 

याशिवाय, शिवसेनेची कृषी कायद्यावरून राज्यसभेत एक भूमिका, लोकसभेत वेगळी भूमिका, आझाद मैदानात आणि आघाडीच्या बैठकीतही वेगवेगळी भूमिका आहे. शिवसेना सध्या अमिबालाही लाज वाटेल, अशा भूमिका घेत असल्याची टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?"मी अयोध्येला गेलो तेव्हाच स्पष्ट केले होते, की भाजपापासून दूर गेलो आहे, हिंदुत्वापासून नाही. हिंदुत्वाचे ‘पेटंट’ भाजपाने घेतलेले नाही; पण शिवसेना महाराष्ट्रापुरती राहिल्याने दरम्यानच्या काळात हिंदुत्वाचा पर्याय उभा करण्याबाबत देशात एक पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याची गरज आहे. एखादा पक्ष ती एकटा भरून काढेल किंवा काही जण एकत्र येऊन भरून काढतील; पण आता पर्याय हवा असे लोकांना वाटू लागले असून, लोकांना वाटते तेव्हा पर्याय उभा राहतो,"असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात देशात नवी समीकरणे उदयाला येऊ शकतात, असे सूचित केले आहे. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना