शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

ज्यांना भारतातील विविधता स्वीकारार्ह नाही, त्यांना देशभक्त म्हटलं जातंय- सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 5:49 PM

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोनिया गांधींनी मोदींवर टीका केली आहे. मोदी सरकारनं अनेक संस्थांना संपवल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास संविधानाला पूर्वीसारखंच गतवैभव प्राप्त करून देऊ, काही जणांना देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जात आहे. विचारांच्या आधारवर स्वतःच्याच देशातल्या नागरिकांशी भेदभाव करत आहेत.काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी आपण विचारही करू शकत नव्हतो की, अशी परिस्थिती येणार आहे. गेल्या काही काळापासून आपल्या देशातील मूळ आत्म्याला एका विचारधारेच्या आडून तुडवलं जातंय. ज्या संस्थांना आम्ही प्रगतिपथावर आणून मजबूत केलं, त्या सर्वांनाच मोदी सरकारनं जवळजवळ संपवल्यात जमा आहे. 65 वर्षात मेहनत करून तयार केलेल्या जनकल्याणाच्या मूल संरचना भाजपानं संपवण्याचं काम केलं आहे.

आज देशभक्तीची नवी परिभाषा शिकवली जातेय. देशातील विविधता स्वीकार न करणाऱ्यांना देशभक्त म्हटलं जातंय. धर्म आणि विचारधारेच्या आधारवर देशातील नागरिकांमध्ये करण्यात येत असलेल्या भेदभावाला मोदी सरकार योग्य ठरवत आहे. देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडलेली असून, मोदी सरकारला ती रुळावर आणायची नसल्याची टीका सोनियांनी केली आहे. काही वेळापूर्वी काँग्रेस उमेदवार डॉली शर्मा यांच्या समर्थनार्थ काढलेल्या रोड शोमधून प्रियंका गांधींनी मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी खोटं बोलत आहेत.

भाजपाच्या पाच वर्षातल्या कार्यकाळातील एकाही यशस्वी कामाबद्दल ते सांगू शकत नाहीत. ते आमच्या परिवाराचा द्वेष करतात. ते म्हणतात, नेहरूंनी हे केलं, इंदिरांनी ते केलं, पण मोदीजी तुम्ही काय केलं?, पाच वर्षांत देशातील कोणती कामं केली?, असा प्रश्नही प्रियंका गांधींनी उपस्थित केला आहे. जीटी रोडवरून काढलेला रोड शो संपल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. त्या म्हणाल्या, स्वतःचा लोकसभा क्षेत्र असलेल्या वाराणसीत मोदी कधीही कोणत्या गावात गेलेले नाहीत, ते फक्त इथे येऊन भाषणं ठोकतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSonia Gandhiसोनिया गांधी