... then the third number will be vaccinated against corona; Prakash Ambedkar's challenge | ...तर तिसऱ्या नंबरला कोरोना लस टोचून घेईन; प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना आव्हान

...तर तिसऱ्या नंबरला कोरोना लस टोचून घेईन; प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना आव्हान

अकोला : पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का टोचून घेतली नाही या खुलासा करावा. लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांनी आधी लस टोचून घ्यावी, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मी लस घेईन असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 


पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते कधी लस घेणार हे जाहीर करावे आणि ते थेट लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आव्हान आंबेडकर यांनी दिले आहे. अकोल्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. 


याचबरोबर धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने अभय दिले आहे. त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत विषय़ आहे. माझ्या पक्षात जर मुंडे असते तर मी नक्की त्यांचा राजीनामा घेतला असता, असेही आंबेडकर म्हणाले. 
 

Web Title: ... then the third number will be vaccinated against corona; Prakash Ambedkar's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.