शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Corona Bed Scam: तेजस्वी सूर्या बेड स्कॅमवरून वादात; 'त्या' 17 कर्मचाऱ्यांची नावे वाचल्याने जातीयवादाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 11:58 AM

Tejaswi Surya exposed bed Scam in Bengaluru hospitals: तेजस्वी सूर्या यांच्यासह काही नेत्यांनी बीबीएमपीमध्ये अधिकारी आणि काही लोक वेबसाईटवर बेड फुल झाल्याचे दाखवत होते. प्रत्यक्षात अनेक कोरोनाबाधित बरे होऊन जात होते.  जे रुग्ण कोरोना बाधित आहेत परंतू होम आयसोलेट आहेत त्यांच्या नावे हे बेड आरक्षित केले जात होते.

बंगळुरु महापालिकेचा कोरोना बेड स्कॅम (Corona Bed Scam) उघडकीस आणणारे भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या वादात सापडले आहेत. तेजस्वी सूर्या (Tejaswi Surya) यांनी कोरोना काळात भाजपाचीच (BJP ) सत्ता असलेल्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लाच घेऊन कोरोना रुग्णांना बेड दिले जात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. मात्र, त्यांचे आमदार असलेल्या काकांनी मदरशावर वक्तव्य केल्याने तेजस्वी यांच्यावर जातीय रंग दिल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. (BJP MP Tejaswi Surya in problem on Corona Bed scam issue; allegations of racism on them.)

Corona Bed Scam: तेजस्वी सूर्या यांनी मोठा घोटाळा उघड केला; भाजपशासित महापालिका हॉस्पिटलमध्ये बेडसाठी लाचखोरी

तेजस्वी सूर्या यांच्यासह काही नेत्यांनी बीबीएमपीमध्ये अधिकारी आणि काही लोक वेबसाईटवर बेड फुल झाल्याचे दाखवत होते. प्रत्यक्षात अनेक कोरोनाबाधित बरे होऊन जात होते.  जे रुग्ण कोरोना बाधित आहेत परंतू होम आयसोलेट आहेत त्यांच्या नावे हे बेड आरक्षित केले जात होते. या रुग्णांना याची कल्पनाही नव्हती, असा आरोप सूर्या यांनी केला होता. या प्रकरणी बीबीएमपीने वॉर रुममध्ये असलेल्या 17 लोकांना कामावरून कमी केले आहे. 

जातीयवादी अँगल दिल्याच्या आरोपावर सूर्या यांनी त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना व्हायरस हा एक धर्मनिरपेक्ष व्हायरस आहे. शेकडो लोकांच्या जिवाशी खेळणारे या घोटाळ्याला जातीयवादी अँगल देत आहेत. हा एक घोटाळा होता, मी मूर्ख नाहीय की अशा प्रकरणात जातीयवादी अँगल शोधत बसू. मी जेव्हा बीबीएमपी वॉर रुममध्ये गेलो तेव्हा मला समजले की 17 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मला तेथूनच नावे मिळाली, आणि मी ती नावे वाचून या लोकांना आरोग्य यंत्रणेमध्ये कोणत्या आधारे नियुक्त करण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांना विचारले होते.

तेजस्वी सूर्या यांचे काका रवी सुब्रमण्यम यांनी बीबीएमपी अधिकाऱ्यांना जाब विचारताना हे लोक मदरशांमधून आले होते का असा सवाल केला. यावरून हा वाद निर्माण झाला आहे. यावर सूर्या यांनी सांगितले की, मी तिथे एकटाच नव्हतो. अन्य आमदारही होते. यामुळे काकांच्या वक्तव्याला मी जबाबदार नाही असे सूर्या यांनी सांगितले.मी कोणाला आतंकवादी म्हटलेले नाही. सोशल मीडियावर जे काही बोलले जाते आहे त्याला मी जबाबदार नाही. चामराजनगरमधील संकटावरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी काही विरोधी नेते, लोक भाजपाला विधानसभा निवडणुकीत घेरण्यासाठी अशाप्रकारचे आरोप करत आहेत. त्यांना या घोटाळ्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आहे, असा आरोप सूर्या यांनी केला. 

टॅग्स :Tejasvi Suryaतेजस्वी सूर्याBJPभाजपाBengaluruबेंगळूरcorona virusकोरोना वायरस बातम्या