शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone: उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं काम चांगलं, तेच खरे शिवसैनिक; नितेश राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 12:56 IST

Tauktae Cyclone: तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सारखं केंद्राकडे मदतीचं रडगाणं गात बसू नये. जमत नसेल तर सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्याला दौरा कसं म्हणणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री नुकसान झालेल्या भागात गेले तरी का? नुकसानग्रस्त गावकऱ्यांशी बोलले का? त्यांचे अश्रू तरी पुसले का?, मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष काय बघितलं? अशा प्रश्नांची सरबत्तीच नितेश राणे यांनी केली आहे.'टीव्ही-९' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या कामाबद्दल टीका करताना नितेश राणे यांनी यावेळी शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा दाखला दिला. "कोकणातील जनतेनं बाळासाहेबांवर खूप प्रेम केलं. पण उद्धव ठाकरेंनी त्या नात्याचा गैरफायदा घेतला. शिवसेना आणि कोकण हे नातं उद्धव ठाकरेंना कळालं असतं तर कोकणवासियांचा असा अपमान केला नसता. उलट उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. त्यांनी किमान कोकणाला मदत तरी पाठवली. बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कसा असतो ते त्यांनी दाखवून दिलं. त्यांचे मी आभार मानेन. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडून काहीतरी शिकावं असा सल्ला मी देईल", असं नितेश राणे म्हणाले. 

लिपस्टिक नव्हे, हा तर पावडर दौराराज्याच्या मुख्यंत्र्यांच्या कपड्याची इस्त्री देखील मोडत नाही. ते आले तसचे परत गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात असा दौरा कुणी पाहिला नसेल. मी याआधी या दौऱ्याला लिपस्टिक दौरा म्हटलं होतं. पण हा तर नुसता पावडर दौरा होता. चेहऱ्याला पावडर लावतो तसा हा दौरा होता, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळEknath Shindeएकनाथ शिंदे