शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

कठीण आहे राव; भाजपच्या जाहिरातीत चिदंबरम यांच्या सूनबाईंचा फोटो झळकतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 11:15 IST

भाजपनं प्रचारासाठी जो व्हिडीओ पोस्ट केला त्यात असलेली महिला कलाकार ही काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम होत्या. 

ठळक मुद्देभाजपनं जारी केलेल्या व्हिडीओत झळकल्या होत्या कार्ति चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरमकाँग्रेसनंही ट्वीट करत साधला निशाणा

तामिळानाडूमध्ये आपलं अस्थित्व वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. परंतु प्रचाराच्या ठिकाणी मात्र त्यांची मोठी गफलत झाली आहे. भाजपच्या तामिळनाजू युनिटनं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ त्यांच्या प्रचाराचाच एक भाग होता. परंतु त्यामध्ये एका महिला कलाकाराला दाखवण्यात आलं होतं ती कलाकार काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांची पत्नी श्रीनिधी चिंदबर होती. याची माहिती मिळाल्यानंतर भाजपनं त्वरित आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ हटवला.माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या सुपुत्र कार्ति चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम या एक कलाकार आहेत. तसंच त्या एक मेडिकल प्रोफेशनलही आहेत. भाजपनं आपलं व्हिजन आणि जाहीरनामा समोर ठेवण्यासाठी एक कॅम्पेन व्हिडीओ जारी केला होता. यामध्ये तामिळनाडूच्या संस्कृतीचा उल्लेख करण्यात आला. यामध्ये कार्ति चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम यांचा भरतनाट्यम हा नृत्य प्रकार करतानाचाही एक व्हिडीओ होता. इतकंच नाही तर हा भाग ज्या गाण्यात वापरण्यात आला होता ते गाणंही डीएमकेचे प्रमुख असलेले आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांनी लिहिलं होतं. अशातच हा कॅम्पेन व्हिडीओ भाजपच्या समस्या वाढवणारा ठरला. सोशल मीडियावर भाजपच्या या कॅम्पेन व्हिडीओला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर भाजपनं हा व्हिडीओ हटवला.काँग्रेसकडूनही ट्वीटकाँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांनी ट्विटरवर याची माहिती दिली. तर दुसरीकजे काँग्रेसनं ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला. भाजपनं श्रीनिधी चिदंबरम यांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरला. कॅम्पेन व्हिडीओमध्ये सिद्ध झालं की भाजपकडे स्वत:चं असं कोणतंबी व्हिजन नाही, असं काँग्रेसनं म्हटलं. तामिळनाडूमध्ये ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेसP. Chidambaramपी. चिदंबरमKarti Chidambaramकार्ती चिदंबरमTwitterट्विटरTrollट्रोल