शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

ऐन निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, NDAमधील आणखी एका मित्रपक्षाने साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 5:21 PM

Assembly Elections 2021:पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपा आणि त्याच्या नेतृत्वाखालील एनडीएला अजून एक मोठा धक्का बसला आहे.

चेन्नई - तामिळनाडूमध्ये होत असलेली विधानसभेची निवडणूक भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना जड जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Tamil Nadu Assembly Elections 2021) विविध ओपिनियन पोलमधून राज्यात द्रमुक-काँग्रेसच्या (DMK-Congress) यांच्या आघाडीचा विजय होणार असल्याचा कल वर्तवला जात आहे. अशा कठीण परिस्थितीत भाजपा आणि त्याच्या नेतृत्वाखालील एनडीएला तामिळानाडूमध्ये अजून एक मोठा धक्का बसला आहे. अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके (DMDK) या पक्षाने पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. (A major blow to the BJP before the by-elections, DMDK left NDA )

तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर एआयएडीएमकेने दिलेल्या शब्दानुसार जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही आघाडी तोडत असल्याचे डीएमडीकेने म्हटले आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभेसाठी ६ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल हा २ मे रोजी लागेल. 

राज्यातील लोकप्रिय नेत्या राहिलेल्या जे. जयललिता यांच्या निधनानंतर सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरा जाणार आहे. विरोधी पक्ष असलेल्या डीएमके आणि काँग्रेसने एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत या पक्षांना घवघवीत यश मिळाले होते. तर एनडीएला तामिळनाडूमध्ये नामुष्कीला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, आता विधानसभा निडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच दणदणीत विजय मिळवण्याची अपेक्षा एनडीएला असेल. राज्यातील सत्ताधारी असलेल्या एआयएडीएमकेने आपला सहकारी पक्ष असलेल्या भाजपाला २३४ पैकी २० जागा देण्याची घोषणा केली होती. तर आघाडीतील अन्य मित्रपक्ष असलेल्या पीएमकेला २३ जागा दिल्या होत्या. दरम्यान एआयएडीएमकेने सहा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर डीएमडीकेने एनडीएला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली.  दरम्यान, तामिळनाडूमध्ये एनडीए आणि यूपीएमधील घटक पक्षांसह अभिनेते कमल हसन यांचा पक्ष असलेला एमकेएम पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. एमकेएमने राज्यातील विधानसभेच्या २३४ जागांपैकी १५४ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर असदुद्दीन ओवेसांचा एआयएमआयएम पक्ष टीटीव्ही दिनाकरन यांच्या अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (एएमएमके) या पक्षाकडून आघाडी केली आहे. 

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाAll India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगमPoliticsराजकारण