शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

SurJyotsna Awards 2021: आघाडीचं स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती, 'दिशा' चुकतेय; आशिष शेलार म्हणाले शब्दाचा 'अर्थ' तुम्हीच लावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 20:04 IST

Ashish Shelar Talks on Shivsena Uddhav Thackreay, MNS Politics: आघाडीचं स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात आहे पण त्यांचे मंत्री अडथळे आणतायत का? असं विचारलं असता शेलार यांनी यामुळे सरकारची दिशा चुकतेय असे म्हटले.

राज्यातील शिवसेनाप्रणित उद्धव ठाकरे यांचे महाआघाडी सरकार गेल्या काही महिन्यांपासून नाजूक प्रकरणांनी घायाळ झाले आहे. यावर भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे सरकार आणि मनसे इंजिनासोबतच्या कथित युतीच्या दिशेने वाक्बाण सोडला आहे. (Bjp mumbai Precident Ashish Shelar talks on Municiple Election, MNS, Shivsena.)

लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. आघाडीचं स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात आहे पण त्यांचे मंत्री अडथळे आणतायत का? असं विचारलं असता शेलार यांनी यामुळे सरकारची दिशा चुकतेय असे म्हटले. त्यानंतर जाता जाता दिशा या शब्दाचा अर्थ तुम्ही तुमच्या पद्धतीनं घ्या, असं मिश्किलपणे म्हणाले. दिशा सालियान आत्महत्येवरून शेलारांनी उद्धव ठाकरे यांचे पूत्र आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर बाण सोडला आहे.  

मनसे भाजपा युतीबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजप फक्त मुंबईकरांच्या जवळ, इंजिनाच्या जवळ नाही. आम्ही मनसेच्या जवळ गेलो नाही आणि तेही आमच्या जवळ आले नाहीत, मुंबईकरांच्या मनात फक्त कमळ, इंजिन, हात, घड्याळ, धनुष्यबाण वगैरे काही नाही, असे शेलार म्हणाले. 

SurJyotsna Awards 2021: राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार का?; अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं...

संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात.

टॅग्स :sur Jyotsna awardसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारAshish Shelarआशीष शेलारBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे