शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

SurJyotsna Awards 2021: 'त्या' प्रश्नावर बाळासाहेब थोरात हसत हसत म्हणाले, 'आनंदी आनंद गडे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 18:32 IST

Balasaheb Thorat on Deputy Chief Minister post : काँग्रेसदेखील उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना आलं होतं उधाण

ठळक मुद्देकाँग्रेसदेखील उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना आलं होतं उधाणयापूर्वी अजित पवार, छगन भुजबळ यांनीदेखील यावर केलं होतं भाष्य

काही दिवसांपूर्वी काँग्रेसदेखील उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. दरम्यान, यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या केवळ चर्चाच असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी आनंदी आनंद गडे असं म्हणत थेट बोलणं टाळलं. राज्यात कांग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते."आम्ही समाधानी आहोत. परंतु राजकारणात अशा चर्चा होतच असतात. पद दुय्यम असतं. पण जनतेच्या प्रश्नांसाठी महत्वाचंही असतं," अस थोरात म्हणाले. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत सवाल करण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी या केवळ चर्चा असल्याचं म्हटलं होतं. तर महाविकास आघाडीत वर्षभरानंतर बदलांचे वारे वाहू लागल्याच्या चर्चा सुरू होत्या. यादेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी फेटाळून लावल्या होत्या.

संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात. 

टॅग्स :sur Jyotsna awardसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारChagan Bhujbalछगन भुजबळLokmatलोकमत