सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांशी बंदद्वार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 06:21 IST2021-02-03T06:20:40+5:302021-02-03T06:21:14+5:30

Politics News : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी बंदद्वार चर्चा केली. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Sudhir Mungantiwar's closed door discussion with the Chief Minister | सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांशी बंदद्वार चर्चा

सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांशी बंदद्वार चर्चा

मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी बंदद्वार चर्चा केली. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. इतर विषयांव्यतिरिक्त सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबतही दोघांमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुनगंटीवार हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर सडकून टीका करीत आहेत. मात्र, आज अचानक ते मुख्यमंत्र्यांना भेटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी रात्री मुंबईत झाली होती आणि त्यानंतर लगेच मुनगंटीवार मुख्यमंत्र्यांना भेटले. ‘आज मी माझ्या मतदारसंघातील काही प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो. ज्यांना राजकीय अर्थ काढायचा आहे त्यांना काढू द्या. काही झालं तर चांगलंच होईल’ अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी या भेटीनंतर पत्रकारांना दिली.

Web Title: Sudhir Mungantiwar's closed door discussion with the Chief Minister