आसाम गण परिषदेचा अस्तित्वाचा संघर्ष; काँग्रेस आघाडीचे आव्हान, भाजपचा सहकारी झाला दुबळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 04:50 AM2021-03-16T04:50:56+5:302021-03-16T04:51:51+5:30

गुवाहाटी : आसाममध्ये १९८५ मध्ये आंदोलनाच्या परिणामस्वरूप एक पक्ष उदयाला आला. आसाम गण परिषद (एजीपी) त्याचे नाव. आसामी लोकांचा ...

The struggle for the existence of the Assam Gana Parishad; The challenge of the Congress front, the BJP's ally became weak | आसाम गण परिषदेचा अस्तित्वाचा संघर्ष; काँग्रेस आघाडीचे आव्हान, भाजपचा सहकारी झाला दुबळा

आसाम गण परिषदेचा अस्तित्वाचा संघर्ष; काँग्रेस आघाडीचे आव्हान, भाजपचा सहकारी झाला दुबळा

googlenewsNext

गुवाहाटी : आसाममध्ये १९८५ मध्ये आंदोलनाच्या परिणामस्वरूप एक पक्ष उदयाला आला. आसाम गण परिषद (एजीपी) त्याचे नाव. आसामी लोकांचा अभिमान म्हणून या पक्षाकडे बघितले जात होते. आज रालोआचा दुबळा घटक पक्ष म्हणून आसाम गण परिषदेकडे पाहिले जात आहे. एक काळ असा होता की, भाजपने आसाम गण परिषदेचा ज्युनिअर सहकारी म्हणून राज्यात पाय रोवले होते. मात्र, आज मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वात भाजपचा विस्तार झाला आहे. हेच सोनोवाल कधी काळी एजीपीमध्ये होते. तेच आज भाजपचे राज्यात नेतृत्व करत आहेत. रालोआ जिंकणार की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दहा पक्षांची महाआघाडी हा प्रश्न अनुत्तरित असला तरी एजीपी पूर्वीपेक्षा अधिक कमजोर होऊ शकतो. भाजपकडून २६ जागा मिळविण्यात हा पक्ष यशस्वी ठरला असला तरी यातील बहुतांश जागा जिंकणे अवघड आहे. (The struggle for the existence of the Assam Gana Parishad; The challenge of the Congress front, the BJP's ally became weak) 

एजीपीसाठी का आहे जागा जिंकणे अवघड ?
 एजीपी आमदारांच्या जागा भाजपने त्यांच्याकडून काढून घेतल्या आहेत. यात माजी मुख्यमंत्री आणि एजीपीचे संस्थापक प्रफुल्ल महंत यांच्या जागेचाही समावेश आहे. महंत यांची प्रकृती सध्या बरी नाही. तथापि, पक्षाचे अध्यक्ष अतुल बोरा यांनी महंत यांची जागा भाजपला देण्यास सहमती दर्शविल्याने महंत यांचे समर्थक नाराज आहेत. 

कारण, काँग्रेसकडून सुरेश बोरा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. ते २०१६ मध्ये महंत यांच्याकडून पराभूत झाले होते. महंत यांचे समर्थक मतदार रालोआच्या विरोधात मतदान करतील तर सत्ताधारी आघाडीसाठी तो धक्का ठरू शकतो. 

- एजीपीने मागील वेळी ज्या जागा जिंकल्या होत्या त्यात कमलपूर, लखीमपूर, नाहरकटिया आणि पटाचारकुची यांचा समावेश आहे. या जागा आता भाजपने आपल्याकडे घेतल्या आहेत. 

- पटाचारकुची हा मतदारसंघ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रणजीत दास यांनी एजीपीकडून घेतला आहे. 

- भाजपने गतवेळच्या आपल्या ८ जागा एजीपीला दिल्या आहेत. मात्र, काँग्रेस - एआययूडीएफ आघाडीमुळे या जागा जिंकणे अवघड झाले आहे. कारण, हे मुस्लिमबहुल मतदारसंघ आहेत. 

- २०१६ च्या आकड्यांचा आधार घेतला तर काँग्रेस- एआययूडीएफचे मते संयुक्तपणे ५४ टक्क्यांवर आहेत. गत निवडणुकीत काँग्रेस आणि एआययूडीएफ यांच्यात मतांची विभागणी झाली होती. काँग्रेसने ३१ टक्के, तर एआययूडीएफने २३ टक्के मते घेतली होती, तर भाजप-एजीपीला ४१.९ टक्के मते मिळाली होती. 

- राहा, बभनीपूर, नोबोइचा या मतदारसंघात 
एजीपी काट्याची लढत देऊ शकते. 
 

Web Title: The struggle for the existence of the Assam Gana Parishad; The challenge of the Congress front, the BJP's ally became weak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.