शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

हेरगिरी प्रकरण: संसदेतील गोंधळ, गदारोळ थांबवण्यावर तोडगा निघेना, चर्चेवर विरोधक आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 9:56 AM

फोन टॅपिंग (पेगासस) प्रकरणावरून संसदेत निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत असले तरी ही कोंडी दूर करण्याच्या मन:स्थितीत विरोधक नाहीत.

- व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : फोन टॅपिंग (पेगासस) प्रकरणावरून संसदेत निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत असले तरी ही कोंडी दूर करण्याच्या मन:स्थितीत विरोधक नाहीत. भाजपलादेखील पडद्यामागील हालचालींतून काही सकारात्मक निष्कर्ष निघेल याची खात्रा नाही.“विरोधकांनी सभागृहात येऊन चर्चेत सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते; परंतु ते दूर पळत आहेत. तथापि, त्यांना यातून काहीही मिळणार नाही”, असे भाजपचे लोकसभेतील प्रमुख प्रतोद (व्हीप) राकेश सिंह यांनी त्यांच्याशी रविवारी संपर्क साधल्यावर सांगितले. केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नकवी यांनी, “काँग्रेस हा हेरगिरीचा तर जेम्स बाँड होता,” असा आरोप केला. ते म्हणाले, “इतर काही विरोधी पक्षांचे धोरण हे आरोप करून पळून जायचे असे आहे.”राज्यसभेतील नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी हे सभागृहातील कोंडी दूर करण्यासाठी काही विरोधी नेत्यांच्या संपर्कात आहेत.  या प्रयत्नांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे; परंतु काही खासदारांचे मत असे की, कोंडी दूर करण्यासाठी मध्यम मार्ग काढण्यासाठी कदाचित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे योग्य नेते आहेत. या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाल्याने संसदेचे कामकाज होऊ शकलेले नाही. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा