शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या पाण्याचा संघर्ष पेटला; शरद पवार, अजित पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली, पोलीस सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 11:14 IST

काही दिवसांपासून दोन्ही बाजूंकडून शेतकरी संघटना आक्रमक होत असल्याने उजनीचा पाणी प्रश्न पेटला आहे

ठळक मुद्देगेल्या ३० वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न इंदापूर-सोलापूरच्या लोकप्रतिनिधींच्या आरोप-प्रत्यारोपामुळे आणखी चिघळला आहे.पाच टीएमसी पाण्याच्या उपशावरून पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यात संघर्ष सुरू सोलापुरातील काही शेतकरी बारामतीत आंदोलन करण्याच्या तयारीत होते.

बारामती – उजनी धरणाच्या पाण्यावरून सध्या पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात संघर्ष पेटला आहे. आता या आंदोलनाची धग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यापर्यंत पोहचली आहे. पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी आणि अजितदादांच्या सहयोग सोसायटी घराच्या बाहेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून पोलीस सतर्क झाले आहेत.

उजनीच्या पाणी वाटपावरून(Ujani Water Disputes) सोलापुरातील काही शेतकरी बारामतीत आंदोलन करण्याच्या तयारीत होते. त्याआधीच पोलिसांना ३ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पोलिसांनी पवारांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. मागील काही दिवसांपासून दोन्ही बाजूंकडून शेतकरी संघटना आक्रमक होत असल्याने उजनीचा पाणी प्रश्न पेटला आहे. इंदापूर तालुक्यासाठी ५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला त्यावरून हा संघर्ष सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या ३० वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न इंदापूर-सोलापूरच्या लोकप्रतिनिधींच्या आरोप-प्रत्यारोपामुळे आणखी चिघळला आहे. उजनी धरणक्षेत्र परिसरातील पाच टीएमसी पाण्याच्या उपशावरून पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यात संघर्ष सुरू झाला आहे. अवर्षणप्रण क्षेत्रातील आणि रखडलेली म्हणून इंदापूर तालुक्याला मंजूर झालेली योजना पाणी वाटप योजनेत बसत नसल्याचे सांगत सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या विरोधाने रद्द झाली आहे. या योजनेचे भवितव्य आता राज्य सरकारच्या हाती आहे. कोणताही निर्णय झाल्यास एक गट नाराज होणार आहे आणि संघर्ष कायम राहील.

माझ्यासाठी इंदापूर आणि सोलापूर दोन्हीही समान आहेत. मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांबरोबर येणाऱ्या काळात सर्वसमावेशक चर्चा करण्यात येईल. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील.- दत्तात्रय भरणे, आमदार इंदापूर आणि पालकमंत्री सोलापूर जिल्हा

सांडपाण्याचे गणित दाखवून अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने उजनीतून पाणी पळविण्याचा घाट घातला गेला आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ६०० कोटीची तरतूद सुचविली आहे. इंदापूरच्या शेतकऱ्यांना आमचा विरोध नाही. खडकवासला योजनेतून त्यांना पाणी द्या. पण उजनी पाणी वाटपातून थेंब शिल्लक नसताना, हा अट्टाहास कशाला? - प्रशांत परिचारक, आमदार

उजनीचे पाणी वाटप झालेले आहे. आता योजनांसाठी थेंबही पाणी शिल्लक नसताना सांडपाण्याचे गणित दाखवून बारामती, इंदापूरला पाणी पळविण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. - प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. आंदोलने सुरू झाली. भाजपचे आमदार, खासदारांनी या योजनेला विरोध केलाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे, संजय शिंदे, यशवंत माने, कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे,तसेच शिवसेनेचे शहाजीबापू पाटील, यांनीही विरोध केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारDamधरणPoliceपोलिसWaterपाणी