शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मग तुम्ही पंजा कापून टाकणार का? नाना पटोलेंचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 5:57 AM

विधान सभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोप प्रत्यारोप होत आहेत. यापैकी काही मुद्दे ,किस्से....

सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी भाषण करताना काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या सोहळ्यावरून टीका केली होती. ऑगस्ट क्रांती मैदानावर ज्या स्तंभाला त्यांनी सॅल्यूट केला, त्यावर कमळ कोरलेले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले होते. त्याचा समाचार नाना पटोले यांनी गुरुवारी घेतला. ज्या हाताने तुम्ही मुद्दे लिहिता, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या पंजाचा वापर करता तो आमच्या पक्षाचे चिन्ह आहे, मग तुम्ही काय पंजा कापून टाकणार का? असा थेट सवाल पटोले यांनी केल्यानंतर विरोधी बाकावरून तीव्र भावना उमटल्या नसतील तर नवल...

कसले आले सोशल डिस्टन्सिंग...विधानसभेत एका सदस्याच्या बाजूला दुसऱ्या सदस्याने बसू नये म्हणून वेगळ्या पद्धतीची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी फुलीचे चिन्ह लावले आहे, तेथे कोणी बसू नये, असे अपेक्षित आहे. त्यामुळेच अनेक आमदारांना प्रेक्षक गॅलरीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, सभागृहात पहिल्या दिवसापासून सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्रास डावलले जात आहेत. एकमेकांच्या शेजारी, गळ्यात हात टाकूनही अनेक सदस्य गप्पा मारत बसलेले दिसतात. खाली बसलेले सदस्य एकमेकांच्या शेजारी बसलेले चालतात. मग आम्हाला का वरती बसवले? असा सवाल गॅलरीत बसलेले आमदार विचारत आहेत. सभागृहात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे असे पालन होत असेल तर आम्ही बाहेर काय सांगणार? असा प्रश्न गॅलरीत बसून वैतागलेल्या आमदाराने विचारला.

प्रणितीच्या मदतीला आले फडणवीसकाँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी, कुष्ठरोग्यांना केवळ मदत न करता त्यांच्या राहण्याची वेगळी व्यवस्था करण्याची काही योजना आखणार का? असा प्रश्न विचारला होता. मात्र, ज्या विषयावर चर्चा चालू आहे, त्याच्याशी संबंधित हा प्रश्न नाही, असे उत्तर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले. मी विचारले काय आणि मंत्री उत्तर काय देत आहेत, असे प्रणिती शिंदे म्हणत होत्या. पण त्यांचे कोणी ऐकत नव्हते. तेव्हा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या मदतीला धावून आले. "प्रणिती शिंदे यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यावर सरकार कुष्ठरोग्यांसाठी राहण्याची काही वेगळी व्यवस्था करणार आहे का? याचे उत्तर दिले पाहिजे", असे फडणवीस म्हणाले. त्यानंतर राज्यमंत्र्यांच्या मदतीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख धावून आले. फडणवीस यांची सूचना स्तुत्य आहे, सरकार त्या कल्पनेचा समावेश आराखड्यात करेल, असे उत्तर दिले.

आमदारांना लॅपटॉप दिले खरे पण ते चालत नाहीतआमदारांना लॅपटॉप दिले खरे पण ते चालत नाहीत. बॅटरीच चार्ज नाही, ते ठेवायला आम्हाला जागाच नाही, अशा अनेक तक्रारी विधानसभेत आमदारांनी केल्या. सध्या प्रेक्षक व अधिकाऱ्यांसाठीच्या गॅलरीचा वापर सदस्यांसाठी केला जात आहे. मोठ्या प्रमाणावर आमदार गॅलरीतील खूर्चीवर बसतात. तेथे समोर टेबल नसतो. त्यामुळे शेजारच्या खूर्चीवर त्यांना लॅपटॉप ठेवावा लागतो. ही गोष्ट काही आमदारांनी सभागृहात बोलून दाखवली. पण ‘नोंद घेण्यात आली’ यापलिकडे त्यांना कोणतेही आश्वासन मिळाले नाही.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोले