...म्हणून त्या अग्रलेखाविरोधात सेनाभवनावर मोर्चा काढला; भाजपानं सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 12:57 PM2021-06-17T12:57:51+5:302021-06-17T13:01:13+5:30

Shivsena-BJP News: सामनातील अग्रलेखाविरोधात सामनाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याऐवजी थेट शिवसेना भवनासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन का केले, असा सवाल आता विचारला जात आहे. त्याला आता भाजपाकडून उत्तर देण्यात आले आहे.

... So We marched on Sena Bhavan against that front article; The BJP stated the exact reason | ...म्हणून त्या अग्रलेखाविरोधात सेनाभवनावर मोर्चा काढला; भाजपानं सांगितलं नेमकं कारण

...म्हणून त्या अग्रलेखाविरोधात सेनाभवनावर मोर्चा काढला; भाजपानं सांगितलं नेमकं कारण

Next

मुंबई - काल शिवसेनाभवनासमोरशिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे मुंबईसह राज्यातील वातावरण तापले आहे. या घटनेबाबत दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. दरम्यान,  राममंदिराबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून लिहिण्यात आलेल्या ज्या अग्रलेखावरून हा वाद झाला. त्याविरोधात सामनाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याऐवजी थेट शिवसेना भवनासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन का केले, असा सवाल आता विचारला जात आहे. त्याला आता भाजपाकडून उत्तर देण्यात आले आहे. (So We marched on Sena Bhavan against that front article; The BJP MLA Amit Satam stated the exact reason)

लोकमतच्या एका विशेष चर्चेमध्ये भाजपाचे आमदार अमित साटम यांनी शिवसेना भवनासमोर आंदोलन का केलं, याचं नेमकं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले की, ज्या प्रकारची भाषा सामनामधून वारंवार वापरली जाते. पत्रकारिता ही वेगळी बाब. ही पत्रकारिता नाही. जसे यांचे शिवसैनिक आवेशात येतात तसे आमचे भाजयुमोचे कार्यकर्तेही आवेशात येतात. त्यामुळे वारंवार होणारे असे बिलो द बेल्ट हल्ले सुरू होते ते कुठेतरी भाजयुमोच्या युवा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले होते. तुम्ही एकदा लिहाल दोनदा लिहाल. मात्र दहाव्यांदा लिहिल्यावर अकराव्या वेळी कुठला ना कुठला कार्यकर्ता प्रतिक्रिया देणारच, असे अमित साटम यांनी सांगितले.

दरम्यान, शांततापूर्वक, लोकशाहीच्या मार्गाने भाजयुमोचा कार्यकर्ता त्याठिकाणी आंदोलन करण्यासाठी गेला होता. त्यांनी तिथे आंदोलन केलं. त्यांना अटक झाली. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी तीनचार कार्यकर्ते वेगळे उभे होते. त्यात एक महिला होती. तेव्हा उर्वरित कार्यकर्ते गेल्यानंतर पोलिसांच्या आडून ५०-६० जणांच्या जमावाने या तीन चार जणांवर हल्ला केला, ही वस्तुस्थिती आहे. जसे यांचे शिवसैनिक आवेशात येतात तसे आमचे कार्यकर्तेही आवेशात येतात. जसं यांना लागतं, तसं आमच्या लोकांनाही लागतं. गेल्या सहा सात वर्षांत शिवसेनेकडून होणारी टीका अनेकदा सहन केली आहे. शिवसेनेकडून सत्तेत असतानाही भाजपाच्या नेत्यांवर बिलो द बेल्ड हल्ले सुरू होते. मात्र अशी टीका होऊनही कार्यकर्ते शांत होते. मात्र कधीनाधील अशा संतापाचा उद्रेक होतो, तो काल झाला, असे भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले. 

दरम्यान, राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला होता. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येत आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती. काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली, धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या आस्थेवरही आघात करत असल्याचा आरोप भाजपने केले.  

Web Title: ... So We marched on Sena Bhavan against that front article; The BJP stated the exact reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app