शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

महाराष्ट्रात परिस्थिती राष्ट्रपती राजवटीसारखीच; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 07:21 IST

धमकावणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले; सरकारची वर्षपूर्ती; फडणवीस यांची ठाकरेंवर टीका

मुंबई : ‘हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहात, संविधानानुसार घेतलेली शपथही विसरले. अशी भाषा? वापरणे हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते शनिवारी पत्रपरिषदेत बोलत होते. मंत्रालयात बदल्यांचे दलाल फिरत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

पत्रकार, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते, माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणेमार्फत होत आहे. राज्य सरकारच्या या दडपशाही कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी प्रकरणात जोरदार ताशेरे ओढले आहेत. अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणातही उच्च न्यायालयाने सरकारी यंत्रणेच्या वर्तनावर कडक शब्दांत भाष्य केले आहे. यातून धडा घेऊन मुख्यमंत्र्यांनी धमकावण्याची भाषा बंद करावी, असे फडणवीस म्हणाले.

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये वर्षपूर्तीचा आढावा अपेक्षित होता. पुढची दिशा काय यावर काही सांगता आले असते पण मुलाखतीत केवळ धमक्याच दिसल्या. अशी भाषा नाक्यांवर वापरली जाते. विकासाच्या मुद्यावर अजिबात भाष्य न करता धमकीची भाषा वापरली गेली. हे स्थगिती सरकार आहे. मराठा आरक्षणाचा घोळ सरकारने अजूनही सुरूच ठेवला आहे. न्यायालयात वकील हजर राहत नाहीत. शेतकऱ्यांना ५० हजार, २५ हजार रुपये एकरी मदतीची भाषा हवेत विरली.  कोणत्याही घटकाचे समाधान करू शकत नाही. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण, मृत्यू महाराष्ट्रात आहेत तरीही कोरोनाची स्थिती उत्तमरीत्या हाताळल्याचा दावा कशाच्या आधारावर केला जातो, असा सवाल फडणवीस यांनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. अतुल भातखळकर यांनी लिहिलेल्या आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामाचा पंचनामा करणाऱ्या पुस्तिकांचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. 

परिस्थिती राष्ट्रपती राजवटीसारखीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, ही आमची मागणी नाही. पण संवैधानिक यंत्रणा कोलमडणे आणि सत्तेचा गैरवापर ही राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे. अर्णव गोस्वामी अन् कंगना रनौत प्रकरणात कोर्टाच्या निकालाने तेच दिसले, असेही फडणवीस म्हणाले.

 सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न करून थकल्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट यावी, असा विरोधकांचा प्रयत्न आहे. आधीच्या सरकारमध्ये मंत्रालयात कोण-कोण दलाल फिरत होते, याची यादी आपल्याकडे आहे.- अनिल देशमुख, गृहमंत्री  

फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे राजकीय विरोधकांच्या कुंडल्या असल्याचे धमकवायचे. ती कोणती भाषा होती? केंद्रीय यंत्रणांचा वापर सूडबुद्धीने केला जात आहे. असा दबाव फारकाळ टिकत नसतो. - खा. संजय राऊत, शिवसेना नेते

 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे