संपूर्ण मोदी सरकारने शेतकऱ्यांचे पाय अश्रूंनी धुवायला हवेत, पण...; संजय राऊत यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 01:49 PM2021-02-10T13:49:41+5:302021-02-10T13:56:09+5:30

Shivsena Sanjay Raut And Narendra Modi : शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.

Shivsena Sanjay Raut Slams Narendra Modi Over farmers protest | संपूर्ण मोदी सरकारने शेतकऱ्यांचे पाय अश्रूंनी धुवायला हवेत, पण...; संजय राऊत यांचा टोला

संपूर्ण मोदी सरकारने शेतकऱ्यांचे पाय अश्रूंनी धुवायला हवेत, पण...; संजय राऊत यांचा टोला

Next

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. याच दरम्यान शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. "शेतकऱ्यांसाठी कोणाच्याही डोळ्यात अश्रू येत नाही" असं म्हणत पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. "संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत पण त्याच्यावर सर्वजण मौन बाळगून आहेत आणि त्या आंदोलनाची चेष्टा आणि थट्टा करताहेत, ते नौटंकी आहे असं म्हणताहेत. हा फार विचित्र प्रकार आहे" असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

"नरेंद्र मोदी यांनी फार चांगल्या पद्धतीने कारभार पाहिला आहे. मुख्यमंत्री असताना त्यांच्या भावनेचा कधी बांध फुटला नाही तर ते कठोर राज्यकर्ते म्हणून काम करत होते. पण जेव्हा ते दिल्लीत आले तेव्हा पहिल्या दिवसापासून अधूनमधून भावनेचा बांध फुटतोय. त्यांच्या अश्रूंच्या संदर्भात कोणीही राजकारण करू नये अथवा चेष्टा करू नये" असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी आंदोलनाबाबत विचारलं असता संपूर्ण मोदी सरकारने शेतकऱ्यांचे पाय अश्रूंनी धुवायला हवेत असं म्हटलं आहे. "लाखोंच्या संख्येने शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर आहेत. दोनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण आजारी पडलेत. घर दार टाकून थंडी वाऱ्यात म्हातारे शेतकरी कुडकुडत बसले आहेत. अश्रुंचा महापूर यावा, राज्यकर्त्यांच्या डोळ्यात, असा हा प्रसंग असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलं आहे. 

"कोणत्या परिस्थितीत शेतकरी राहतोय हे पाहून राज्यकर्त्यांच्या भावना अनावर व्हायला पाहिजेत"

"एकटे नरेंद्र मोदी नाही तर संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत. पण त्याच्यावर आता सर्वजण मौन बाळगून आहेत आणि त्या आंदोलनाची चेष्टा आणि थट्टा करताहेत, ते नौटंकी आहे असं म्हणताहेत. हा फार विचित्र प्रकार आहे. कोणत्या परिस्थितीत शेतकरी राहतोय हे पाहून आपल्या राज्यकर्त्यांच्या भावना अनावर व्हायला पाहिजेत. हाथरसच्या घटनेवर कोणी अश्रू ढाळले नाहीत. महाराष्ट्रात पूर्वी काही प्रकार घडले त्यावर अश्रू येत नाहीत. खरं तर यायला पाहिजेत. राज्यकर्ता हा भावनाविवश असायला पाहिजे. तरच तो राज्यकर्ता" असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. 

पंतप्रधान स्वत:ही 'आंदोलनजीवी' होते; हा देश आंदोलनातूनच तयार झाला : संजय राऊत

नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपल्या संबोधनादरम्यान आंदोलनजीवी असा उल्लेख केला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. "आम्ही सर्वकाही आहोत, आम्ही बुद्धीजीवी आहोत, आम्ही आंदोलनजीवी आहोत, आम्ही कमलजीवी आहोत. हा देश जीवांनीच तयार झाला आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी हे स्वत: एक आंदोलनजीवी होते," अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम अयोध्येचा प्रवास केला. ते श्रीनगरच्या लाल चौकातही गेले. महाराष्ट्रात भाजप आंदोलन करत आहे. तर काय भाजपा पंतप्रधानांविरोधात आंदोलन करत आहे का? पंतप्रधानांनी ही गोष्ट मजेत घेतली हे योग्य नाही. हा देश जनआंदोलनातूनच तयार झाला आहे," असंही राऊत यावेळी म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. 

पंतप्रधानांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. परंतु लोकांनाही त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीदेखील आंदोलन केल्याचं ते म्हणाले. "देशभक्त आणि देशद्रोहींची आता वेगळी व्याख्या तयार झाली आहे. जे भाजप विरोधी सरकार आहे त्यांनी काहीही केलं तर तो देशद्रोह होतो. मुंबईमध्ये आम्ही टीआरपीचा तपास केला तर बड्या व्यक्तींनी आपल्या शेतकऱ्यांच्या विरोधात जे ट्वीट केले ते कोणाच्या दबावाखाली केले का याचा तपास सरकार करत आहे," असं राऊत म्हणाले. 

Web Title: Shivsena Sanjay Raut Slams Narendra Modi Over farmers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.