शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

Narayan Rane vs Shivsena : "नारायण राणेंचा फुगा फुटला, सामान्य शिवसैनिकांनीच तो फोडला; सध्या ते ऑक्सिजनवर आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 10:33 IST

Shivsena Dr. Manisha Kayande Slams BJP Narayan Rane : शिवसेनेने आता नारायण राणेंवर हल्लाबोल केला. "नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत" असं म्हणत निशाणा साधला.

मुंबई - केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे (BJP Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू असून, मुंबई, वसई-विरारनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कोकणात दाखल झाली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे यांची जीभ घसरली आणि मी असतो तर कानाखाली चढवली असती, असे खळबळजनक आणि वादग्रस्त विधान नारायण राणे यांनी केले. या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या विधानावर शिवसैनिक चांगलेच संतापलेत. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. तसेच शिवसेना नेतेही यावर आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. 

शिवसेनेने आता नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या डॉ. मनीषा कायंदे (Shivsena Dr. Manisha Kayande) यांनी राणेंच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. आपल्या ट्विर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "दिल्लीश्वरांच्या समोर त्यांना रोज मुजरा करावा लागतोय. मंत्रीपद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मातोश्रीवर टीका करावीच लागणार आहे आणि तसं केलं नाही तर त्यांचे मंत्रीपद देखील टिकणार नाही" असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. 

मनीषा कायंदे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये "नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत. दिल्लीश्वरांच्या समोर त्यांना मुजरा करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणतंही काम राहीलेलं नाही. त्यांच्यावर एकच जबाबदारी दिली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करा. मातोश्रीवर टीका करा आणि शिवसेनेवर टीका करा. हेच त्यांचं ऑक्सिजन आहे. आणि हे त्यांनी केलं नाही तर त्यांचं मंत्रीपद जाणार आहे. त्यामुळे मंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांना हे करावंच लागणार त्यामुळे नारायण राणे काय करतायत त्याची आम्हाला अजिबात चिंता नाही" असं म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र