शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

शिवसेना भाजपाला मोठा धक्का देणार, दोन मोठे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधणार

By बाळकृष्ण परब | Published: January 05, 2021 6:12 PM

Nashik POlitics News : एकेकाळचे मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा सध्या विविध मुद्द्यांवरून आमने-सामने आलेले आहेत. त्यातच आता शिवसेनेने भाजपाला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे.

नाशिक - एकेकाळचे मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा सध्या विविध मुद्द्यांवरून आमने-सामने आलेले आहेत. त्यातच आता शिवसेनेने भाजपाला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब सानप यांना आपल्या गोटात खेचून भाजपाने शिवसेनेची कोंडी केल्यानंतर आता शिवसेनेनेही भाजपाच्या दोन नेत्यांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपाचे दोन नेते गुरुवारी हाती शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे.शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत गुरुवारी नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या दौऱ्यामध्ये भाजपाचे दोन नेते शिवसेनेत दाखल होणार आहेत. मात्र हाती शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असलेले भाजपाचे हे नेते कोण आहेत, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.काही दिवसांपूर्वी भाजपाने माजी आमदार बाळासाहेब सानप यांना शिवसेनेमधून आपल्या पक्षात आणले होते. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेला धक्का बसला होता. मात्र बाळासाहेब सानप यांचा भाजपाप्रवेश पक्षातील अनेकांना रुचला नव्हता. त्यामुळे अनेकांनी सानप यांना पक्षात प्रवेश देऊ नये अशी विनंती केली होती. मात्र हा विरोध डावलून सानप यांनी पक्षात प्रवेश दिला गेला होता. त्यामुळे भाजपातील अनेक जण नाराज आहेत.आता याच नाराजीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आता शिवसेना आणि संजय राऊत भाजपाला केवढा मोठा धक्का देतात याचा उलगडा होण्यासाठी अजून दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण