शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात महाआघाडीचा सुरात सूर; जिल्ह्यात मात्र तीन पक्षांचा ताल जमेना, शिवसेनेकडून इतरांना सोबत न घेण्याची भूमिका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 13:18 IST

Maharashtra News: दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या आघाडीचा संसार दोन वर्षे यशस्वीरित्या सुरूही आहे. मात्र राज्यात नेत्यांचे सूर जुळले असले तरी अजून जिल्हा, तालुका पातळीवर मात्र हे सूर जुळलेले नाहीत.

- मनोज मुळ्ये रत्नागिरी : दोन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यातील सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या आघाडीचा संसार दोन वर्षे यशस्वीरित्या सुरूही आहे. मात्र राज्यात नेत्यांचे सूर जुळले असले तरी अजून जिल्हा, तालुका पातळीवर मात्र हे सूर जुळलेले नाहीत. चिपळूण नगर परिषद आणि चिपळूण पंचायत समितीवगळता अन्य कोठेही हे तीन पक्ष एकत्र आलेले नाहीत.राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मात्र पंचायत समिती सभापती, विषय समिती सभापती निवडणुकीत चिपळूण वगळता कोठेही महाविकास आघाडी दिसलेली नाही. (Mahavikas Aghadi News)

केवळ चिपळूण पंचायत समितीत महाआघाडीचिपळूण पंचायत समिती वगळता इतर आठही पंचायत समित्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्रच आहेत. चिपळुणात सभापती निवडीसाठी महाआघाडी झाली आहे.

राजापुरात सेना - काँग्रेस आमनेसामनेचथेट नगराध्यक्ष निवडणुकीत राजापुरात काँग्रेसचे जमीन खलिफे विजयी झाले. राज्यात महाविकास आघाडी असली तरी राजापुरात मात्र काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कायमच एकमेकांसमोर उभे असतात.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला पद नाहीजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती निवडणूक झाली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपाध्यक्ष पदाची मागणी होत होती. पण शिवसेनेचे संख्याबळ खूपच मोठे असल्याने शिवसेनेने राष्ट्रवादीला कोणतेही पद दिले नाही.

चिपळुणात भाजपविरोधासाठी महाविकास आघाडीनगर परिषदांच्या निवडणुका झाल्या तेव्हा राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता होती. मात्र दोघांमध्येही वितुष्ट आले होते. त्यात चिपळूणमध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने बाजी मारली. शिवसेनेचे संख्याबळ अधिक असले तरी नगराध्यक्ष पद म्हणून सत्ता भाजपकडे होती. त्यावेळी भाजपला शह देण्यासाठी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची महाआघाडी झाली. ही आघाडी राज्याच्या सुत्रानुसार झालेली नसून, भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर झाली आहे. त्यामुळेच अनेक विषयांबाबत महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता दिसत नाही. भाजपला विरोध हेच मुख्य सूत्र असल्याने येणाऱ्या  निवडणुकांमध्ये हे तीन पक्ष एकत्र निवडणूक लढतील, असे दिसत नाही.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव म्हणतात...पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला असल्याने आम्ही त्याला बांधिल आहोत. स्थानिक पातळीवरही आघाडी करण्याची आमची तयारी आहे. मात्र शिवसेनेकडून अजून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीRatnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस