शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना माफिया म्हणता, त्यांच्याच संरक्षणात फिरता?; राऊतांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 17:31 IST

नाव न घेता संजय राऊत यांचा कंगनाला सवाल; भाजपवरही डागली तोफ

मुंबई: शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. मुंबईत येतेय, रोखून दाखवा असं आव्हान देऊन मुंबईत दाखल झालेल्या कंगनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता निशाणा साधला. ज्या पोलिसांना नावं ठेवता, माफिया म्हणता, त्याच पोलिसांच्या संरक्षणात फिरता, अशा शब्दांत राऊत यांनी कंगनाला लक्ष्य केलं. तुम्ही ज्या अभिनेत्रीचं नाव घेताय, तिचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे, असं म्हणत राऊत यांनी कंगनाचं नाव घेणं टाळलं. कंगनाच्या मागे कोणाचा हात आहे, हे सगळ्यांना माहीत असल्याचं राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. कंगना राणौतला बीएमसीचा आणखी एक ‘जोर का झटका’, खारमधील फ्लॅटप्रकरणी पाठवली नोटीसमुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. मुंबई प्रत्येकाची आहे. मात्र तिला बदनाम करण्याचा हक्क कोणालाही नाही. सध्या कोणता पक्ष काय बोलतोय याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. सत्ता गेलेली मंडळी राज्याबद्दल काय बोलत आहेत, याची नोंद आम्ही ठेवत आहोत, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. एखाद्यानं ठरवलंच असेल की तमाशाच करायचा, तर करू द्या, असा टोलादेखील त्यांनी लगावला.एक संपली की एक समस्या...! रोज नव्या वादामुळे कंगना राणौत त्रासली?शिवसैनिकांनी मुंबईत एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र शेअर केल्यानं ही मारहाण करण्यात आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करत कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. 'घटनेनं निर्माण केलेल्या पदांवर असलेल्या व्यक्तींचा आदर राखणं नागरिकांचं कर्तव्य असतं. कोणीही आम्हाला विचारुन हल्ला करत नाही. मग त्या हल्ल्याची जबाबदारी सरकारची कशी?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कायदा सुव्यवस्था राखणं म्हणजे नेमकं काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारला थेट लक्ष्य केलं. 'मुंबईत माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला. त्यांची विचारपूस केली. संरक्षणमंत्री यामध्ये फार रस घेत आहेत. उत्तर प्रदेशात कॅप्टनला गोळी घालण्यात आली होती. त्यावेळीही त्यांनी असाच फोन केला होता का?,' असा प्रश्न राऊत यांनी विचारला.कंगनाच्या आडून कोण राजकारण करतंय याची सगळ्यांना कल्पना आहे. सध्या ते काय काय बोलत आहेत ते आम्ही ऐकतोय. त्याची नोंद घेतोय. त्यांचे विचार पाहतोय. सत्ता गेली म्हणून काय तमाशे सुरू आहेत ते आम्हाला दिसतंय. लोकशाहीत बहुमत अतिशय चंचल असतं. विरोधकांनी संयम राखायला हवा. देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. लडाखमधील तणाव, चीनसोबतचा सीमा प्रश्न, बेरोजगारी, जीएसटी, जीडीपीमधील घट असे प्रश्न आम्ही उद्यापासून सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात मांडू, असं राऊत म्हणाले.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRajnath Singhराजनाथ सिंह