kangana ranaut tweets about life chaos amid word war with-shivsena | एक संपली की एक समस्या...! रोज नव्या वादामुळे कंगना राणौत त्रासली?

एक संपली की एक समस्या...! रोज नव्या वादामुळे कंगना राणौत त्रासली?

ठळक मुद्देआधी कंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामांवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर आता कंगनाविरोधात ड्रग्ज केसची चौकशीही होणार आहे. 

कंगना राणौत व वादांचे जुने नाते आहे़ सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ती सतत चर्चेत आहेत. कंगना व शिवसेना यांच्यातील एक एपिसोड नुकताच गाजला. या वादानंतर कंगना सतत शिवसेना व ठाकरे सरकारला लक्ष्य करतेय. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनेही कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. अशात कंगनाने एक ट्विट केले आहे. हे ट्विट बघता, कंगना कदाचित आपल्या सततच्या समस्यांमुळे त्रासली असल्याचे जाणवतेय.

पुन्हा नवी समस्या...
कंगनाने नुकतचे एक ट्विट केले. ‘मी कुठे आहे, मला समजत नाहीये. आयुष्याने मला आत्तापर्यंत जे काही दाखवले, त्यातून मी कशीबशी बाहेर आले. पण ही आव्हाने संपता संपत नाहीयेत. मी माझी सर्व शक्ती पणाला लावते, मात्र तरीही कमी पडते आणि अचानक पुन्हा नवी समस्या डोके वर काढते,’ असे ट्विट कंगनाने केले आहे.

कंगनाचा शिवसेनेवर आणखी एक हल्ला

कंगनाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर काल एक वादग्रस्त फोटो शेअर केला होता. या फोटोत कंगना राणी लक्ष्मीबाईंच्या रुपात आहे तर छत्रपती शिवाजी महाराज तिच्या हातात तलवार देत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मागे बुल्डोझर असल्याचे दाखवण्यात आले आहे. फोटोत उद्धव ठाकरेंचा फोटो रावणाच्या रुपात दाखण्यात आले आहे.  
‘माझ्याकडे अनेक मिम्स आले. पण हा फोटो पाहून भावुक झालेय मी, लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र’, असे ट्विट कंगनाने केले होते.

...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

कंगना राणौतने भल्याभल्यांशी घेतलाय ‘पंगा’, उगाच म्हणत नाहीत ‘कान्ट्रोवर्सी गर्ल’

कंगनावर दुसरा वार
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण आणि अंमली पदार्थांवरून राज्य सरकार, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप करणा-या आणि मुंबईची तुलना पीओकेशी करणा-या कंगना राणौतच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. आधी कंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामांवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर आता कंगनाविरोधात ड्रग्ज केसची चौकशीही होणार आहे. महाराष्ट्र सरकारने कंगनाविरोधातील ड्रग्ज केसचा तपास करण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे सोपवली आहे. मुंबई पोलिसांना याबाबतच्या तपासासाठी महाराष्ट्र सरकारकडून अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाविरोधात ड्रग्जचा मुद्दा उपस्थित केला होता. कंगनाचा माजी प्रियकर अध्ययन सुमन यांच्या मुलाखतीच्या आधारावर हा मुद्दा अनिल देशमुख यांनी ऐरणीवर आणला होता. त्या मुलाखतीमध्ये अध्ययन सुमनने कंगना ड्रग्ज घेत असल्याचा दावा केला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut tweets about life chaos amid word war with-shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.