राज-उद्धव एकत्र येणार का? शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 11:55 AM2021-06-05T11:55:28+5:302021-06-05T11:57:28+5:30

संजय राऊत यांचा मनसे प्रमुखांना खोचक टोला

shiv sena mp sanjay raut taunts mns chief raj thackeray | राज-उद्धव एकत्र येणार का? शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात...

राज-उद्धव एकत्र येणार का? शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात...

Next

मुंबई: शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात एकत्र येणार का, या प्रश्नाला राज ठाकरेंनी 'परमेश्वराला ठाऊक' असं उत्तर दिल्यानं उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. आता राज यांच्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं. राजकारणात परमेश्वरावर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला स्वत: परमेश्वरदेखील मदत करत नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधला.

परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो. तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो, त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, असा खोचक टोला राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला. आता राऊत यांना मनसेकडून कोण आणि काय प्रत्युत्तर देतं याबद्दल उत्सुकता आहे.

तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो, म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो, असं उत्तर राज यांनी दिलं.
 

Read in English

Web Title: shiv sena mp sanjay raut taunts mns chief raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.