पुन्हा महाविकास आघाडींतर्गत पक्षांतर, शिवसेना उपशहरप्रमुख समर्थकांसह काँग्रेसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 19:30 IST2021-01-03T19:29:57+5:302021-01-03T19:30:36+5:30

Politics News : सेनेचे उपशहर प्रमुख असलेले अँथोनी मॅनेजिस सातन ह्यांनी रविवारी त्यांच्या अनेक समर्थकांसह काँग्रेस मध्ये प्रवेश केला . काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी सातन व त्यांच्या समर्थकांना काँग्रेस मध्ये पुन्हा प्रवेश दिला .

Shiv Sena leader joins Congress with supporters in Mira road | पुन्हा महाविकास आघाडींतर्गत पक्षांतर, शिवसेना उपशहरप्रमुख समर्थकांसह काँग्रेसमध्ये

पुन्हा महाविकास आघाडींतर्गत पक्षांतर, शिवसेना उपशहरप्रमुख समर्थकांसह काँग्रेसमध्ये

मीरारोड - काशीमीरा भागातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख मेंनेंजिस सातन ह्यांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेस मध्ये प्रवेश करत स्वगृही परतले. २०१७ च्या पालिका निवडणुकी वेळी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष असताना सातन यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता . 

काशीमीरा महामार्ग पट्ट्यातील सेनेचे उपशहर प्रमुख असलेले अँथोनी मॅनेजिस सातन ह्यांनी रविवारी त्यांच्या अनेक समर्थकांसह काँग्रेस मध्ये प्रवेश केला . काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी सातन व त्यांच्या समर्थकांना काँग्रेस मध्ये पुन्हा प्रवेश दिला . ह्यावेळी  जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेवक अनिल सावंत, अश्रफ शेख, गीता परदेशी, रुबिना शेख, एस. ए. खान, महिला अध्यक्ष लीला पाटील, युवक अध्यक्ष दीप काकडे, प्रवक्ते प्रकाश नागणे आदी उपस्थित होते.

अपेक्षा ठेवत पक्षात येणाऱ्यांनी प्रथम समाज कार्याच्या माध्यमातून जनसमस्या सोडवत लोकांना जोडण्याचे काम करावे,  त्यासाठी मेहनत महत्वाची आहे, कार्यकर्त्यां मधूनच नेते घडत असतात, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विचारधारेला पायदळी तुडवत इतर पक्षात जाणाऱ्याना जनता लक्षात ठेवते, त्यामुळे कर्म करीत रहा फळाची अपेक्षा करीत बसू नका असा सल्ला मुझफ्फर हुसेन यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विश्वासावर आपण शिवसेनेत गेलो . परंतु महापालिकेतील सेनेचे पदाधिकारी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांनी आणलेल्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी सोडवण्या कडे दुर्लक्ष करत आहेत . सेनेत राहून जनतेची कामे होत नसल्याने आपण पुन्हा स्वगृही काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याचे सातन म्हणाले . 

 

Web Title: Shiv Sena leader joins Congress with supporters in Mira road