शरद पवारांच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; धर्मावर अन् देवावर श्रद्धा कायम असते, तसेच...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 03:10 PM2020-07-20T15:10:36+5:302020-07-20T15:15:38+5:30

या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेलं आहे, आणि ही लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने असं राऊत म्हणाले.

Shiv Sena first reaction to Sharad Pawar statement over Ram Mandir Ayodhya | शरद पवारांच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; धर्मावर अन् देवावर श्रद्धा कायम असते, तसेच...

शरद पवारांच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; धर्मावर अन् देवावर श्रद्धा कायम असते, तसेच...

Next
ठळक मुद्देकोरोनाची लढाई ही पांढऱ्या कपड्यातील डॉक्टर आहेत ज्यांना आम्ही देवदूत म्हणतो, ते लढतायेतही लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने, शिवसेनेची भूमिका शिवसेना आणि अयोध्येचं नातं आहे, राजकारणासाठी आम्ही अयोध्येला कधीच गेलो नाही

मुंबई – राम मंदिर भूमिपूजनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली, राम मंदिर बांधल्याने कोरोना जाईल असं काहींना वाटतं असे ते म्हणाले त्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेलं आहे, कोरोनाची लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, कोरोनाची लढाई ही पांढऱ्या कपड्यातील आमचे डॉक्टर आहेत ज्यांना आम्ही देवदूत म्हणतो, ते लढतायेत, धर्मावर आणि देवावर श्रद्धा कायम असते, या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेलं आहे, आणि ही लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने असं ते म्हणाले.

तसेच उद्धव ठाकरे अयोध्येला नेहमीच जातात, मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेले, नसतानाही गेले, शिवसेना आणि अयोध्येचं नातं आहे, राजकारणासाठी आम्ही अयोध्येला कधीच गेलो नाही, राम मंदिराचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे, मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे शिवसेनेने दूर केले, ते राजकारण म्हणून नाही तर श्रद्धा आणि हिंदुत्व याच भावनेने आम्ही केले, ते नातं कायम आहे असं स्पष्ट शब्दात शिवसेना नेते संजय राऊतांनी भूमिका मांडली आहे.

तर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरली असेल, तर कोणाकोणाला निमंत्रण पाठवली जातात, त्यामुळे राजकीय सोशल डिस्टेसिंग किती पाळतात बघावं लागेल असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

राम मंदिराच्या भूमिपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी टोला लगावला होता. काही लोकांनी वाटतेय की राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हे त्यांनी ठरवायला हवे. सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवे. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांनी बाहेर काढायला हवे. कदाचित राम मंदिरामुळे कोरोना जाईल असे त्यांना वाटत असावे. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्था खचली आहे. त्यावर मोदींनी लक्ष द्यावे, असे मला वाटत असल्याचे पवार म्हणाले. आपले खासदार याबाबत जिथे गरजेचे आहे तिथे सरकारचे लक्ष वेधतील असंही पवार यांनी सांगितलं होतं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

"रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलो पाहिजे; उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर..."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाला उपस्थित राहणार? लवकरच भूमिका जाहीर करणार

धक्कादायक माहिती! भारताविरुद्ध नेपाळच्या बदललेल्या भूमिकांमागे फक्त चीनचा हात नव्हे तर...

 ‘या’ ठिकाणी कोरोना लसीच्या अंतिम टप्प्याची चाचणी सुरु; लवकरच लोकांना उपलब्ध होणार

आजपासून ग्राहकांना मिळणार 'हे' नवीन अधिकार; दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांना चाप बसणार

Read in English

Web Title: Shiv Sena first reaction to Sharad Pawar statement over Ram Mandir Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.