शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Sena-BJP clash: शिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी; पालिका निवडणुकीत पडसाद उमटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 06:55 IST

shiv sena-BJP clash: राजकीय अस्तित्व टिकवण्याची लढाई. शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या विस्तवही जात नाही. मुंबईत ‘आवाज कुणाचा’ या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मागील महापालिका निवडणुकीत मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : युती तुटल्यानंतरच्या काळातील शिवसेना आणि भाजपच्या ताणलेल्या संबंधांचीच चुणूक बुधवारी शिवसेना भवनासमोरील राड्याच्या निमित्ताने पाहायला मिळाली. मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येईल तशी ही राजकीय खुन्नस वाढत जाईल. त्या दृष्टिकोनातून पाहता ही घटना येत्या काळातील शिवसेना विरुद्ध भाजप संघर्षाची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना भवन परिसरात जोरदार राडा; राम मंदिर जमीन गैरव्यवहारावरून शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले

शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या विस्तवही जात नाही. मुंबईत ‘आवाज कुणाचा’ या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मागील महापालिका निवडणुकीत मिळाले नाही. तेव्हापासून मुंबईत दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी एकमेकांना भिडत आहेत. मागच्या पालिका निवडणुकीत जो प्रश्न अनिर्णीत राहिला, त्याचा निकाल या निवडणुकीत लावण्यासाठी दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते सज्ज झाले आहेत. स्थानिक पातळीवरचे नेतेही एकमेकांना खुन्नस देऊन आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यातूनच हा राडा झाल्याचे चित्र आहे. भाजयुमोचे आंदोलक आंदोलन करून गेले आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची राजकीय खुन्नस समोर आली.

मागील पालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी मुंबईत भाजप ही शिवसेनेला तुल्यबळ असल्याचे दाखवून दिले. आगामी पालिका निवडणुकीत आपलीच सरशी व्हावी, यासाठी शिवसेना राज्यातील सत्तेचा खुबीने वापर करत राजकीय मांडणी करत आहे; त्याच वेळी भाजप नेत्यांनीही मागची कसर भरून काढण्यास कंबर कसली आहे. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही दिसत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या पालिका निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत स्थानिक पातळीवर राजकीय स्पर्धा, संघर्षाचे रूपांतर राड्यातच होत राहणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका