शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

शिवजयंतीच्या कार्यक्रमात रोहित पवारांनी भर पावसात केले भाषण, उपस्थितांना आली शरद पवारांची आठवण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 3:54 PM

Rohit Pawar in Shiv Jayanti 2021 : रोहित पवारयांनी केलेल्या या भाषणामुळे उपस्थितांना शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेमध्ये केलेल्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण झाली. 

अहमदनगर - दीड वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी साताऱ्यामध्ये भर पावसात केलेले भाषण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अविस्मरणीय ठरले होते. दरम्यान, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज शिवजयंतीच्या (Shiv Jayanti 2021) कार्यक्रमात भर पावसात उपस्थितांना संबोधित केले. रोहित पवार यांनी केलेल्या या भाषणामुळे उपस्थितांना शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेमध्ये केलेल्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण झाली.  ( Rohit Pawar gave a speech in rain, the audience remembered Sharad Pawar)

शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमदार रोहित पवार आज जामखेडमध्ये आले होते. कार्यक्रमादरम्यान अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. मात्र रोहित पवार यांनी आपले संबोधन सुरू ठेवले. ते म्हणाले की, आज शिवजयंतीनिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. काही तरुणांनी मर्दाने खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले. आज करण्यासारखे खूप होते. मात्र अचानक पाऊस आला. त्यामुळे कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. मी आयोजकांना एवढेच सांगतो की, पाऊस आला असला तरी तुमचे प्रयत्न हे महत्त्वाचे होते. उद्देश महत्त्वाचा होता. दिवस चांगला होता. अशाच प्रकारे लोकांच्या सेवेसाठी तुम्ही काम करत राहा, असे आवाहनही रोहित पवार यांनी यावेळी केले. दरम्यान, पाऊस सुरू असतानाही रोहित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधल्याने अनेकांना शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात असताना शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये भर पवसात एका सभेला संबोधित केले होते. त्या सभेमुळे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी वातावरणनिर्मिती झाली होती. तसेच साताऱ्यातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या उदयनराजेंचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. तसेच विधानसभेतही राष्ट्रवादील ५४ जागा मिळाल्या होत्या. अखेर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले होते. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShivjayantiशिवजयंतीkarjat-jamkhed-acकर्जत-जामखेडPoliticsराजकारण