शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या ‘गुगली’ ने अहमदनगर,सांगली आणि पुणे मतदार संघात उडाला राजकीय धुराळा .. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 11:47 IST

अहमदनगरची जागा काँग्रेससाठी मुळीच सोडली वगैरे नाही, पक्षाकडे या जागेवर लढण्यासाठी अनेक सक्षम उमेदवार आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये ताणाताणी: झाले मात्र काहीच नाही 

पुणे: लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची वेळ जवळ येऊ लागली आहे तसे राजकीय पक्षांमधील जागांच्या देवाणघेवाणीवरून बराच राजकीय धुरळा उडू लागला आहे. शुक्रवारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील काही जागांच्या देवाणघेवाणीवरून अहमदनगर, सांगली व पुणे या लोकसभा मतदारसंघांमधील राजकीय वर्तुळात अशीच गडबड उडाली, मात्र नंतर त्यात काहीच तथ्य नसल्याचे उघड झाले.या गडबडीचे केंद्र अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणात होते. तिथे दुपारी त्यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेसला दिली असल्यासारखे काहीतरी वक्तव्य केले. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, मात्र तिथे त्यांच्याकडे सध्या उमेदवार नाही. त्यामुळे काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आपले पुत्र डॉ. सूजय विखे यांच्यासाठी ही जागा मिळावी असा आग्रह धरला आहे. त्यासाठी त्यांनी पवारांनी पवार विखे संघर्ष विसरावा, सुजय त्यांना नातवासारखाच आहे अशी कौटूंबिक आळवणीही केली.पवार यांच्या वक्तव्याची लगेचच काँग्रेससाठी नगर (दक्षिण) सुटली अशी बातमी झाली. त्याचा संदर्भ पुण्याशी लागला. पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही. पवारांना ती हवी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नगर व पुण्यात देवाणघेवाणीचा सौदा झाला असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यातून काँग्रेसच्या पुण्यातून इच्छुक असलेल्यांचे धाबे दणाणले. त्यांनी फोनवर संपर्क साधण्यास सुरूवात केली. त्यावेळी सांगली लोकसभेसाठीची काँग्रेसची जागा घेऊन राष्ट्रवादीने नगरची जागा देऊ केल्याची चर्चा सुरू झाली होती. सांगलीची जागा काँग्रेसकडे आहे, मात्र तेथून लढण्यासाठी काँग्रेसच्या सक्षम नेत्यांनीही नकार दिला आहे. ही जागा आघाडीत असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेला द्यायची म्हणून ही तडजोड झाली असल्याचे सांगण्यात येऊ लागले.अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरची जागा राष्ट्रवादीकडेच असल्याचा खुलासा केला. पवार यांचे वक्तव्य उपरोधिक होते. पक्षाने नगरची जागा काँग्रेससाठी मुळीच सोडली वगैरे नाही, पक्षाकडे या जागेवर लढण्यासाठी अनेक सक्षम उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पुण्यातील काँग्रेसच्या इच्छुकांना निश्वास सोडला. सांगलीमधील गडबडही थांबली. नगरमध्ये मात्र डॉ. विखे यांच्या समर्थकांसमोर पुन्हा आता काय करायचे असा प्रश्न उभा राहिला. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील