शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

आजारपणातून सावरत शरद पवार पुन्हा सक्रिय; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली मोठी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 18:46 IST

Sharad Pawar News : राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून दूर राहावे लागले होते. (Sharad Pawar News) मधल्या काळात त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाल्या. मात्र आता आजारपणातून सावरत शरद पवार हे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सक्रिय झाले आहेत. त्यांनी घरातूनच कामास सुरुवात केली असून, ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यादरम्यान राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. (Sharad Pawar wrote a letter to the Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar )

या पत्रामध्ये शरद पवार यांनी कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही घटकांना मदत करण्याची आवश्यकता असल्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे. तसेच कोरोनाकाळात मोठे आर्थिक नुकसान सहन करत असलेल्या छोट्या हॉटेल व्यावसायिकांना मदत मिळणे आवश्यक असल्याचेही शरद पवार यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांनी  राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेत कोरोनासोबतच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्मधून निधी देण्याची सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादीने पक्षाच्या वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत दिले होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे